chagan bhujbal and nashik | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

रस्ता अडवणाऱ्यांना भुजबळ म्हणाले, " दोन वर्षे तुरुंगात होतो. बाहेर आलोय ते विकासासाठी '

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पश्‍चिमवाहिनी नद्यांचे पाणी वळविण्यासाठीच्या मांजरपाडा प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी परततांना देवसाने (दिंडोरी) येथील ग्रामस्थांनी रस्त्यात अडथळे टाकुन त्यांची वाहने अडवली. या वाट अडवणाऱ्यांशी चर्चा करतांना भुजबळ त्यांना म्हणाले, "आत्ता राज्यात सरकार बदलले आहे. दोन वर्षे मला तुरुंगात रहावे लागले. विकासकामांसाठीच तुरुंगाबाहेर आलो आहे.' 

मांजरपाडा प्रकल्पाची पाहणी करुन परततांना परतीच्या मार्गावर रस्त्यात अडथळे उभारुन देवसाने (दिंडोरी) येथील नागरिकांनी त्यांचा रस्ता रोखला. त्याला शिवसेनेच्या स्थानिक नेत्याची फुस असल्याची चर्चा होती. नेते, कार्यकर्ते समजावुन सांगत होते. माजी आमदार जयंत जाधव यासह विविध नेत्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मात्र भुजबळ यांच्या भेटीचा ग्रामस्थांचा ठाम आग्रह होता. रखडलेली कामे व्हावीत. नदीपात्रात स्थानिकांच्या सिंचनासाठी लहान बंधारे बांधावेत. या त्यांच्या मागण्या होत्या. तेव्हा भुजबळांनी त्यांना " विकासाची कामे करण्यासाठी मी तुरुंगाबाहेर आलो आहे. तुमचे काम देखील करीन.' असे सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. रस्त्यातील अडथळे स्वतः दुर करीत त्यांना मार्गस्थ केले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ यांसह विविध पदाधिकारी होते. 

मांजरपाडा प्रकल्प दिंडोरी आणि सुरगाणा तालुक्‍याच्या सीमेवरील देवसाने गावात होत आहे. या प्रकल्पासाठी गावाचे स्थलांतर झाले. पुल पाडले. रस्ते पाण्यात गेले. एव्हढे करुन पाणी मिळत नाही अशी येथील लोकांची तक्रार आहे. या विषयात राजकारणही आहे. काही दिवसांपूर्वी येथे ग्रामस्थांनी अधिकारी व प्रचाराला गेलेल्या नेत्यांना कोंडले होते. ही या प्रकल्पाची पार्श्‍वभूमी आहे. शनिवारी श्री. भुजबळ यांनी मांजरपाडा व वळण बोगद्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. हा बोगदा झाल्यास येवला, निफाडसह आवर्षणग्रस्त भागाला पाणी मिळणार आहे. त्यामुळे भुजबळ पालकमंत्री असतांना त्यांनी त्यासाठी खास पाठपुरावा केला होता. आता हा प्रकल्प 31 जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. 
 
संबंधित लेख