Chagan Bhujbal About Maharashtra Mega Employment Drive | Sarkarnama

'व्यापम' घोटाळा करणाऱ्यांना महाराष्ट्र नोकर भरतीचे काम नको : छगन भुजबळ 

संपत देवगिरे 
रविवार, 29 जुलै 2018

मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देतांना एकूण आरक्षण पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक झाल्यास त्यावर तोडगा काढण्यासाठी विरोधी पक्ष सहकार्य करण्यास तयार असल्याचे कळविले आहे. या विषयावरुन राज्यातील बहात्तर हजार नोकऱ्यांची भरती प्रक्रीया थांबविणे योग्य नाही. त्याऐवजी मराठा समाजाच्या सोळा टक्के नोकऱ्या बाजुला ठेऊन त्या मराठा समाजाला देण्यात याव्यात - छगन भुजबळ

नाशिक : ''मराठा समाजाच्या सोळा टक्के नोकऱ्या बाजूला ठेऊन नोकर भरतीची प्रक्रीया सुरु करावी. ही भरती करतांना त्याचे काम राज्यातील टाटा कन्सलटन्सी सारख्या संस्थांना द्यावे. मध्य प्रदेशात व्यापम सारखा घोटाळा करणाऱ्या संस्थांना हे काम देऊ नये," अशी सुचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. 

मराठा आरक्षणासंदर्भात विरोधी पक्षाच्या नेत्यांसमवेत शनिवारी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. यासंदर्भात भुजबळ म्हणाले, ''मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देतांना एकूण आरक्षण पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक झाल्यास त्यावर तोडगा काढण्यासाठी विरोधी पक्ष सहकार्य करण्यास तयार असल्याचे कळविले आहे. या विषयावरुन राज्यातील बहात्तर हजार नोकऱ्यांची भरती प्रक्रीया थांबविणे योग्य नाही. त्याऐवजी मराठा समाजाच्या सोळा टक्के नोकऱ्या बाजुला ठेऊन त्या मराठा समाजाला देण्यात याव्यात. याशिवाय खुल्या जागांवर देखील या समाजाला संधी मिळु शकेल. मात्र त्यासाठी मागासवर्गीय, अनुसुचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय जागांवरील भरती थांबविणे हा त्या घटकावर अन्याय अन्याय ठरेल. त्यामुळे ही प्रक्रीया सुरु करावी. त्याचे काम मात्र राज्यातील टाटा कन्सलटन्सी सर्व्हीसेस सारख्या प्रतिष्ठीत संस्थांना देण्यात यावे. मध्य प्रदेशात व्यापम सारखा घोटाळा करणाऱ्या संस्थांकडे शासनाच्या नोकर भरतीचे काम सोपवु नये." 
 

संबंधित लेख