chagan bhujabal yewala shiivsena | Sarkarnama

भुजबळांच्या येवल्यात शिवसेना लागली कामाला

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत येवल्यातून ज्येष्ठ नेते छगन भुजबळांची उमेदवारी निश्‍चितीची घोषणा झाली. शिवसेनेनेही वेळ न दवडता निरीक्षक पाठवुन तातडीने चाचपणी केली. जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे आणि संभाजी पवार हे दोन प्रमुख नेते पक्षात असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. शिवसेनेचे निरीक्षक व धुळे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी एकाचवेळी मेळावे, बैठका आणि इच्छुकांशी बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे राजकीय चर्चेला फोडणी मिळाली आहे. 

लोकसभा, विधानसभा तसेच विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पक्षनिरीक्षक माळी यांनी हा दौरा केला. त्यात त्यांनी जाहीरपणे कार्यकर्ते, समर्थकांशी संवाद साधला. उर्वरीत सर्व संवाद त्यांनी प्रत्येकाशी बंद खोलीत साधला. पक्षाच्या शिवसंपर्क अभियानांतर्गत निरीक्षक म्हणून शिवसेनेचे धुळे जिल्हाप्रमुख माळी यांनी प्रथमच येथील दौरा केला. 

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ येथे येण्यापूर्वी हा मतदारसंघ सलग दहा वर्षे शिवसेनेच्या हाती होता. आता पुन्हा ही संधी चालून आली असून, पवार व दराडे हे दोन प्रमुख नेते पक्षात असल्याने नक्कीच ताकद वाढली आहे. जिल्हा परिषदेसह पंचायत समिती व पालिकेत सत्तेच्या चाव्या हातात असल्याने आता मिशन विधानसभा हे उद्दिष्ट पक्षासमोर असल्याचे यातून दिसून येत आहे. 

शिवसेनेचे निरिक्षक माळी यांनी प्रारंभी बैठक घेतली. त्यानंतर प्रत्येकाशी बंद खोलीत व्यक्तीशः चर्चा केली. प्रमुख नेते व मोजकी मंडळी यावेळी होती. प्रत्येकाचे मत जाणून घेतले. येवल्यासह निफाड तालुक्‍यातील 42 गावांमधील सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी त्यांना मदत केली. मात्र, बंद खोलीत चर्चा होताना त्यांनीदेखील खोलीबाहेरच राहणे पसंत केले. या वेळी जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे, माजी सभापती संभाजी पवार, तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी यांनी निवडणुकीच्या तयारीबाबत निरिक्षकांना तालुक्‍यातील राजकीय समीकरणे व छगन भुजबळ यांच्या तयारीविषयी सुचना केल्या.

एकंदरच माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात अन्य पक्ष अद्याप सुस्त असले तरीही राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना हे परंपरागत प्रतिस्पर्धी मात्र सक्रीय झाले आहेत. 

संबंधित लेख