Chagan Bhijbal % New scorpio | Sarkarnama

आणि छगन भुजबळांनी केली स्कॉर्पियोची  पूजा

सरकारनामा
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

परळी येथे होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवर्तन यात्रेचा समारोप आणि महाघाडीच्या सभेसाठी छगन भुजबळ औरंगाबादहून बीड मार्गे परळीला जात होते.

बीड : पवार साहेबांचे हेलिकॉप्टर तीन वाजता लँड होणार आहे, मला निघायला हवं असं म्हणत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आपल्या वाहनात बसले.

पण, तेवढ्यात 'साहेब, मी मोठ्या कष्टाने स्कॉर्पिओ घेतली आहे, माझ्या स्वप्नाची पूजा तुम्ही करावी ही माझी इच्छा आहे, असा आवाज आला आणि छगन भुजबळ आपल्या वाहनातून खाली उतरले. 

कार्यकर्त्याचा हट्ट नेत्यांना पुरवावा  लागतो . निवडणुकीचा हंगाम अस्त्र मग तर काही बोलायचेच सोया नसते याची या प्रसंगातून आली . 

पाडळशिंगी (ता. गेवराई) येथील विकास चौधरी हा युवक छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक आणि निस्सीम चाहता आहे. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वातील अखिल भारतीय समता परिषदेच्या कामात विकास अग्रेसर आहे .  छगन भुजबळांचा  कुठलाही कार्यक्रम असला तरी विकास चौधरी हमखास हजर असतात . 

 मराठवाड्यात छगन भुजबळ यांची सभा असली की विकास तेथे पोहोचतात .  दरम्यान, विकास चौधरीने नुकतीच स्कॉर्पिओ जीप घेतली आहे. शनिवारी परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवर्तन यात्रेचा समारोप आणि महाघाडीच्या नेत्यांची सभा होत आहे. या सभेसाठी छगन भुजबळ औरंगाबाद येथून बीड मार्गे परळीला निघाले.

 बीडला परिषदेचे विभागीय अध्यक्ष सुभाष राऊत यांच्या हॉटेलवर भुजबळ आले. सत्कार आणि संवाद झाल्यानंतर भुजबळ निघाले. मात्र, भुजबळ वाहनात बसले आणि निघणार तोच विकासाने त्यांना आग्रह केला आणि भुजबळ पुन्हा खाली उतरले आणि विकासाच्या गाडीची पूजा केली.
 

संबंधित लेख