in center want strong government | Sarkarnama

जनतेला "मजबूर' नव्हे,  "मजबूत' सरकार हवे 

वृत्तसंस्था
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

लखनौ,: जनतेला केंद्रात "मजबूर' नाही तर "मजबूत' सरकार हवे आहे, असे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी सोमवारी सांगितले.

समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष (बसप) व कॉंग्रेसच्या युतीचा 2019मधील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या यशावर काहीही परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले.

 उत्तर प्रदेशमध्ये भाजपला शह देण्यासाठी मायावती यांचा "बसप'शी युती करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे विधान समाजवादी पक्षाच्या वतीने केल्यानंतर मौर्य यांनी त्याला उत्तर दिले. ते म्हणाले, ""उत्तर प्रदेशमधील यादवांच्या वर्चस्वाखाली असलेल्या मतदारसंघांत 2014 व 2017मध्ये भाजपने विजय मिळविला. यावरून उत्तर प्रदेशमधील जनता "अवसरवाद' बरोबर नाही तर "राष्ट्रवाद' आणि "विकासवादा'बरोबर आहे.''

मागास समुदायांना भाजपचा पूर्ण पाठिंबा आहे, असा दावा करीत मौर्य म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचा मागासवर्गीयांना अभिमान आहे. आम्हाला त्यांच्याकडून 2019 च्या निवडणुकीत 2014-2017 पेक्षा जास्त प्रतिसाद मिळेल, असेही ते म्हणाले.

"सप-बसप'च्या युतीचा भाजपच्या यशावर काही परिणाम होणार नाही. कारण राज्यातील नागरिक त्यांच्या "लीला' जाणून आहेत, अशी खिल्लीही त्यांनी विरोधकांची उडविली. 

संबंधित लेख