डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची माहिती वेळोवेळी कळवा, केंद्राचे राज्याला फर्मान 

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची माहिती वेळोवेळी कळवा, केंद्राचे राज्याला फर्मान 

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील चौकशीचा अहवाल केंद्राने मागविला आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येची कबूली आरोपी सचिन अंदूरे यांनी दिली असून तो सनातन संस्थेशी निगडीत असल्याचे पुढे आले आहे. याबाबतच्या तपासाची माहिती वेळोवेळी राज्य सरकारने कळवावी, असे केंद्राने राज्य सरकारच्या गृहखात्याला फर्मान काढले आहे. 

राज्यात सध्या दहशतवादी कारवायात सहभागी असल्याच्या आरोपावरून "सनातन संस्थे'वर बंदी घालण्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. याबाबत राज्य सरकारकडून काहीच ठोस पावले उचलली नसल्याचे सांगितले जाते. मात्र केंद्र सरकार सनातनवादी संघटनेसारख्या संस्था आणि त्याचे कार्यकर्ते यांना समज देण्याच्या भूमिकेत आहे. कारण लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जेमतेम सात-आठ महिने शिल्लक आहेत. यातच मागील चार वर्षांमध्ये दलितांच्या हत्या, गोरक्षकांच्या नावाखाली ठेचून मारण्याच्या घटना यामुळे देशात अल्पसंख्याक घटकामध्ये भितीचे वातावरण आहे. 

हे थोडेफार निवळण्यास मदत व्हावी, म्हणून मुलतत्ववादी हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांना समज देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केंद्र सरकार करीत असल्याचे गृहखात्यातील एका वरिष्ठ अधिका-यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सनातन या संस्थेवर बंदीचा फार्स असू शकतो, असेही त्यांचे म्हणणे आहे. 


याबरोबरच कर्नाटक पोलिसांनी पत्रकार गौरी लंकेश आणि लेखक कलबुर्गी यांच्या हत्येची तपास करताना त्याचे धागेदोरे खोलपर्यंत मिळवले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी दहशतवाद प्रतिबंध पथकाकडून पकडलेल्या आरोपीच्या मागावर कर्नाटक पोलिस होते. एटीएसने पकडलेल्या या आरोपींना कर्नाटक पोलिस पकडणार होते. त्यामुळे ही कारवाई केली असल्याचे गृहविभागातून सांगण्यात येते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com