CBI raids on Manoj Jaiswal's offices? | Sarkarnama

दर्डांचे निकटवर्तीय मनोज जयस्वाल यांच्या प्रतिष्ठानांवर "सीबीआय'चे छापे? 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 जून 2017

माजी खासदार विजय दर्डांचे नागपुरातील निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आणि अभिजीत ग्रुपचे अध्यक्ष व उद्योजक मनोज जयस्वाल यांच्या देशातील जवळपास 10 प्रतिष्ठानांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापे घातल्याचे समजते. नागपुरातील कार्यालयातून कागदपत्रांची तपासणी सीबीआयचे अधिकारी करीत असल्याचे समजते. मनोज जयस्वाल यांना अटक झाल्याने नागपुरातील काही बॅंक अधिकाऱ्यांनाही अटक होण्याची शक्‍यता आहे. 

नागपूर : माजी खासदार विजय दर्डांचे नागपुरातील निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आणि अभिजीत ग्रुपचे अध्यक्ष व उद्योजक मनोज जयस्वाल यांच्या देशातील जवळपास 10 प्रतिष्ठानांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापे घातल्याचे समजते. नागपुरातील कार्यालयातून कागदपत्रांची तपासणी सीबीआयचे अधिकारी करीत असल्याचे समजते. मनोज जयस्वाल यांना अटक झाल्याने नागपुरातील काही बॅंक अधिकाऱ्यांनाही अटक होण्याची शक्‍यता आहे. 

विविध बॅंकांची करोडो रुपयांची थकबाकी तसेच मनी लॉंड्रींगच्या आरोपाखाली "सीबीआय'ने मनोज जयस्वाल त्यांचा मुलगा अभिषेक जयस्वाल याला सोमवारी रात्री कोलकाता येथे अटक केली आहे. जयस्वाल पितापुत्रांना 8 दिवसाची सीबीआय कोठडी मिळाली आहे. या कोठडी दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे अभिजीत ग्रुपच्या देशातील 10 कार्यालयांवर छापे टाकण्यात आल्याचे समजते. परंतु या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही. 

मनोज जयस्वाल गेल्या दीड महिन्यापासून नागपुरात आलेले नाहीत. मनोज जयस्वाल यांनी आयडीबीआय, कॅनरा बॅंक, स्टेट बॅंकेसह जवळपास 11 बॅंकांकडून 10 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्‍कमेचे कर्ज उचलले आहे. याकर्जाची परतफेड झालेली नाही. यात बॅंकांचे वरिष्ठ अधिकारीही सामील झालेले आहेत. त्यामुळे या बॅंक अधिकाऱ्यांवरही आता सीबीआयचा मोर्चा वळण्याची शक्‍यता आहे. यामुळे नागपुरात बॅंक अधिकाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. 

संबंधित लेख