cbi investigation demand by jadhav | Sarkarnama

कालवा फुटीवर नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांचा जावईशोध : सीबीआय चौकशीची मागणी

ज्ञानेश सावंत
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

पुणे : खडकवासला धरणाचा कालवा फुटल्याने रस्त्यावर आलेले शेकडो लोक अजूनही सावरलेले नाहीत, तोच कालव्याच्या मुद्यावरून राजकारण रंगू लागले आहे. कालवा फुटला नसून, तो फोडण्यात आल्याचा जावईशोध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांनी लावला. त्यापलीकडे जाऊन कालवा फोडण्याच्या घटनेची "सीबाआय'मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करीत, जाधव यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.

देखभाल-दुरुस्तीअभावी कालवा फुटल्याच्या नोंदी जबाबदार यंत्रणांकडे असतानाच जाधव यांनी या घटनेबाबत प्रश्‍न उपस्थित केल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, "सीबीआय' चौकशीची मागणी करणारे जाधव हे माजी न्यायाधीश असल्याने त्यांनी अशी मागणी करावी, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. थेट सीबीआय तपासाची मागणी पालिकेत पहिल्यांदाच झाल्याचे यानिमित्ताने अनेकांनी सांगितले.
 
पुण्यात उजवा मुठा कालवा फुटल्याने दांडेकर पूल आणि जनता वसाहत परिसरातील रहिवाशांचे नुकसान झाले. त्यात अनेकांची घरे उध्वस्त झाली. कालवा फुटीच्या घटनेवरून सत्ताधारी भाजप आणि विरोध राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाला. त्यापाठोपाठ महापालिका आणि पाटबंधारे खात्यातील वाद अजूनही संपलेला नाही. 

या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. या चर्चेदरम्यान, कालवा फोडण्यात आल्याचा साक्षात्कार भैय्यासाहेब जाधवांना झाला. त्यामुळे कालवा फुटीप्रकरणात नवाच वाद पुढे आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मुळात, ही घटना नैसर्गिंक असल्याचे प्राथमिक चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे. 

शहरातील वेगवेगळ्या मुद्यावर हात घालून जाधव आणि त्यांचे काही सहकारी नगरसेवक नेहमीच आंदोलनाचा पवित्रा घेतात. परिणामी जाधव यांच्यासह नगरसेवक योगेश ससाणे, महेंद्र पठारे हे त्रिकूट आंदोलनावरून चर्चेत असते. त्यातील जाधव यांनी कालवा फुटीवरून भलतीच भूमिका मांडून आपले ज्ञान दाखवून दिले. कालवा फुटीची घटना "सीबीआय' प्रयत्न नेण्याचा आग्रह धरला. आपल्या मागणीला विलंब होऊ नये म्हणून, जाधवांनी महापालिका सौरभ राव यांना पत्रही दिले आहे.  

संबंधित लेख