Cast Verification Committee | Sarkarnama

जात पडताळणी समितीच वादात

उत्तम कुटे
सोमवार, 1 मे 2017

पिंपरी - पुणे विभागीय जातपडताळणी समितीने पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांना दिलेले कुणबी जातपडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर या समित्यांच्या कार्यपद्धतीविषयी शंका निर्माण झाली आहे. तसेच यामुळे ओबीसीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आ्ला आहे.

पिंपरी - पुणे विभागीय जातपडताळणी समितीने पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांना दिलेले कुणबी जातपडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर या समित्यांच्या कार्यपद्धतीविषयी शंका निर्माण झाली आहे. तसेच यामुळे ओबीसीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आ्ला आहे.

या समितीनेच जारी केलेल्या दोन जात प्रमाणपत्राच्या आधारे गत टर्ममधील दोन नगरसेवकांच्या निवडणूका नंतर रद्द झाल्या होत्या. हे दोन्ही नगरसेवक त्यावेळचे सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीचे होते.तर,काळजे हे सुद्धा राष्ट्रवादीतूनच आताचा सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपमध्ये आलेले आहेत. दरम्यान, या निर्णयामुळे पालिकेत प्रथम सत्तेत आलेल्या भाजपचे पहिले महापौर काळजे यांना काहीशी काळजी करण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे.तर, कुणबी ओबीसी दाखल्यावर पालिकेत निवडुन आलेले एक डझन नगरसेवकही रडारवर आले आहेत.

पुणे जात पडताळणी समितीने ग्राह्य धरलेले कुणबी ओबीसीचे प्रमाणपत्र नंतर बनावट सिद्ध झाल्याने गत टर्मच्या भोसरीतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका सीमा फुगे यांचे पद रद्द झाले होते.तर, याच टर्मचे राषट्रवादीचेच जगदीश शेट्टी यांचेही मागासवर्गीय (एससी) असल्याचे प्रमाणपत्र बोगस निघाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांचेही पद नंतर रद्द झाले होते. ही समिती योग्य ती पडताळणी न करता कुणबी ओबीसी दाखले देत असल्याचा पिंपरी
चिंचवड ओबीसी संघर्ष समितीचा आक्षेप आहे.त्यामुळे असे दाखले बोगस असून त्यावर मराठा निवडणूक लढवित असल्याने खऱ्या ओबीसीवर अन्याय होत असल्याचे ओबीसी समितीचे प्रताप गुरव यांचे म्हणणे आहे.   

काळजे यांना कुणबी या ओबीसी जातीचा दाखला देण्याचा पुणे जातपडताळणी समिती क्र.3 चा निर्णय हा असंयुक्तिक असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती नरेश पाटील व शालिनी फणसळकर-जोशी यांनी ओढले आहेत. तसेच तो देताना गुणात्मक चर्चाच झाली नसल्याचा ठपकाही या समितीवर न्यायालयाने ठेवला आहे. त्यामुळे 29 जानेवारी,2012 रोजी या समितीने काळजे यांना दिलेला कुणबी ओबीसीचा दाखला रद्दबातल ठरविला.एवढेच नाही,तर
त्यावर नव्याने सुनावणी घेऊन चार महिन्यात अहवाल सादर करण्यासही सांगितले आहे.काळजे यांच्याविरुद्ध पराभूत झालेले घनश्याम खेडकर यांनी काळजे यांच्या जात प्रमाणपत्राला आव्हान देणारी ही याचिका दाखल केलेली आहे.

काळजे हे गतवेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक होते. त्यावेळी त्यांनी ओबीसीसाठी राखीव असलेल्या प्रभागातून याच दाखल्यावर निवडणूक लढवून ती जिंकली होती.त्यावेळीही खेडकर यांनीच न्यायालयात काळजे यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात धाव घेतलेली आहे. 2012 मधील पालिका निवडणुकीतील हा दावा अद्यापही प्रलंबित आहे.

 

संबंधित लेख