Case registered against parbhani shiv Sena MP Sanjay Jadhav | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

शिवसेना खासदार संजय जाधव आणि बालाजी रुद्रवार यांच्यातील वाद पोलीस ठाण्यात पोहोचला !

सरकारनामा
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

खासदार संजय जाधव यांना असभ्य भाषेत बोलल्याने ताडकळस (ता,पूर्णा) येथील शिवसेनेच्या शहरप्रमुखास मारहाण झाली. 

परभणी : ताडकळस येथील शिवसेनेचे शहरप्रमुख बालाजी रुद्रवार यांना मारहाण केल्या प्रकरणी खासदार संजय जाधव यांच्यावर नानलपेठ पोलिस ठाण्यात सोमवारी (ता.24) अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार संजय जाधव यांना असभ्य भाषेत बोलल्याने ताडकळस (ता,पूर्णा) येथील शिवसेनेच्या शहरप्रमुखास मारहाण झाली. 

परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या बाबतीत ताडकळसचे शिवसेनचे शहर प्रमुख बालाजी रुद्रवार यांनी असभ्य भाषा वापरल्याने त्याची समज देण्यासाठी खासदार संजय जाधव यांनी रुद्रवार यांना शनिवारी (22) स्वताच्या घरी बोलावले होते. 

परंतू खासदार संजय जाधव यांनी आपल्याला घरी बोलावून मारहाण केली अशी तक्रार बालाजी रुद्रवार यांनी केली. याच्या निषेधार्थ ताडकळस गाव सोमवारी काही काळ बंद ठेवण्यात आले. त्यानंतर सांयकाळी खासदार संजय जाधव यांच्यासह त्यांचे समर्थक रामप्रसाद रणेर यांच्याविरोधात नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून खासदार संजय जाधव व रामप्रसाद रणेर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.

संबंधित लेख