Can Ad. Swapnl Gundewar make most out of it ? | Sarkarnama

ॲड. स्वप्नील गुंडेवार संधीचे सोने करणार का ? 

मंगेश शेवाळकर
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

लोकसभा मतदार संघात ॲड. गुंडेवार यांना चांगलाच मान आहे. या शिवाय आर्यवैश्य समाजाची संख्याही लोकसभा मतदार संघात मोठी आहे.

हिंगोली :  जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी (ता.१९) निवड जाहिर करण्यात आली असून त्यास ॲड. स्वप्नील गुंडेवार यांच्याकडे अल्पसंख्याक विभागाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन तरुणाईला राष्ट्रवादीकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हिंगोली लोकसभेचे दोन वेळा प्रतिनिधीत्व केलेल्या खासदार विलास गुंडेवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघात त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव ॲड. स्वप्नील गुंडेवार यांनी जनसंपर्क कायमठेवला आहे. विशेषतः युवावर्गामधे त्यांचा संपर्क आहे.

 लोकसभा मतदार संघात ॲड. गुंडेवार यांना चांगलाच मान आहे. या शिवाय आर्यवैश्य समाजाची संख्याही लोकसभा मतदार संघात मोठी आहे. हिंगोली पालिकेमधे त्यांची स्विकृत सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी कामाची चुणूक दाखवून दिली होती. सर्व सामांनन्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी पुढाकार घेणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. 

ॲड. गुंडेवार राजकारणात प्रवेश करणार काय असा प्रश्न अनेक वेळा उपस्थित करण्यात आला होता. मात्र ॲड. गुंडेवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया न देता मागील तीन ते चार वर्षात जनसंपर्क कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांसोबतच इतर निवडणुकीमधेही त्यांनी राष्ट्रवादीच्या पाठीमागे पाठबळ उभे केले आहे.

त्यांच्या कार्याची पावती म्हणून राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारीणीमधे  त्यांना अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली आहे. यातून राष्ट्रवादीने अल्पसंख्याक समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे बोलले जात आहे. तर ॲड. गुंडेवार संधीचे सोने करतील असा दावा केला जात आहे.
 

संबंधित लेख