cabitne feshuffel in few days | Sarkarnama

मंत्रिमंडळ विस्ताराला अमित शहांचा हिरवा कंदील ? 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 सप्टेंबर 2018

मुंबई : राज्य सरकारचा कालावधी जेमतेम वर्षभराचा उरलेला असताना आगामी लोकसभा व विधानसभेत राजकीय लाभ उठवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त लवकरच ठरण्याचे संकेत आहेत. 

मुंबई : राज्य सरकारचा कालावधी जेमतेम वर्षभराचा उरलेला असताना आगामी लोकसभा व विधानसभेत राजकीय लाभ उठवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त लवकरच ठरण्याचे संकेत आहेत. 

सध्या भारतीय जनता पक्षात कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांसह इतर पक्षातील नेत्यांसाठी दरवाजे उघडले आहेत. महामंडळ अध्यक्ष नेमणूकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे नरेंद्र पाटील तर शिवसेनेचे हाजी अराफत यांना संधी देत इतर पक्षातील इच्छुकांचे लक्ष वेधले आहे. 2014 च्या दरम्यान असलेली भाजपची लाट सध्या तेवढी सहज नसल्याचे चित्र आहे. त्यासाठी विजयी होण्याच्या निकषात जो नेता बसेल त्याला पक्षात घेण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. 

कृपाशंकर सिंह, जयदत्त क्षिरसागर यांना मुख्यमंत्र्यांनी जवळ केले आहे. तर, पक्षातील काही नाराज नेत्यांनाही मंत्रीपद खुणावत आहे. त्यामुळे, आगामी निवडणूकीची मोट बांधताना इतर पक्षातील आयारामांना खुष करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तारासारखी दुसरी खेळी नसल्याचे मानले जाते. 

त्यातच शिवसेनेनं सध्या भाजप सोबत "पॅचअप' केल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्याही काही नेत्यांना मंत्रिपद खुणावत आहे. त्यामुळे, भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षातील नाराजांना शांत करण्यासाठी व आगामी निवडणूकांची रणनिती आखण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लवकरच निघेल असे सुत्रांचे मत आहे. 

भाजप अध्यक्ष अमित शहा मुंबईत गणेश दर्शनाला आले असता त्यांनी मुख्यमंत्र्यासोबत मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा केल्याचे समजते. अमित शहा यांनीही मंत्रीमंडळ विस्ताराला हिरवा कंदिल दिल्याचा दावा करण्यात येत आहे. आगामी पंधरवड्‌यातच मंत्रीमंडळ विस्तार शक्‍य असल्याचे सुत्रांचे मत आहे. 

संबंधित लेख