cabinet minister meeting | Sarkarnama

...आणि मंत्रिमंडळ बैठकीची वेळ चार वेळा रद्द

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मुंबई : श्रावण महिना संपला की येणाऱ्या पहिल्या दिवशी मांसाहार केला जातो, त्याला "कर' साजरी करणे म्हणतात. त्यामुळे उद्याची मंत्रिमंडळाची बैठक सकाळी घेऊन सांयकाळी "कर' आणि मीरा भाईंदरचा विजय साजरा करायचा असे प्लॅनिग असावे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीची वेळ चार वेळा बदलली गेली. दिवसभरात सलग चार वेळा मंगळवारी सकाळी 11 वाजता बैठक होणार असल्याचे फर्मान आले आणि चारही वेळा रद्द झाले. यामुळे नेमकी मंत्रिमंडळाची बैठक कधी, यासाठी दिवसभर मंत्रालयातील अधिकाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र अनेक मंत्र्यांच्या दालनात निर्माण झाले होते. 

कोकणात काही मंडळी मंगळवारी मांसाहार करत नाहीत, मात्र उलट कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्रात मात्र मंगळवारची अडचण नसते. त्यातच मीरा-भाईंदर महापालिकेचा निकाल सरकारच्या बाजुने आल्याने सकाळपासून चार वेळा मंत्रिमंडळ बैठकीचा ठरलेला कार्यक्रम बदलावा लागला असल्याचे एका वरिष्ठ स्तरावरील सूत्राकडून सांगण्यात आले मात्र या बदललेल्या कार्यक्रमामुळे मंत्र्यांकडील अधिकाऱ्यांची दिवसभर तारांबळ उडाली होती. 

शेवटी सायंकाळी उशिरा मंगळवारी होणारी ही बैठक बुधवारी अकरा वाजता ठरल्याचे शेवटचे फर्मान आले आणि अधिकाऱ्यांनी शेवटी उद्याच्या करीसाठी वेळ मिळाला असल्याचा आनंद व्यक्त केला. तर अनेकांनी दिवसभर आलेल्या फर्मानामुळे आता आपण सुटल्याचा सुस्काराही सोडला. 

बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमुळे गावाकडे पोळा साजरा करण्यासाठी गेलेल्या मंत्री,त्यांचे अधिकारी यांची सायंकाळपर्यंत धाकधूक सुरू होती, मात्र साडेपाचच्या नंतर बुधवारी मंत्रिमंडळ बैठक घेण्याची अंतिम सूचना आल्याची माहिती मिळताच अनेकांनी गावीच थांबण्याचे ठरविले असल्याचे सांगण्यात आले. 

संबंधित लेख