Cabinet expansion will take place befor winter session : Devendra Fadnavis | Sarkarnama

मंत्रिमंडळाचा  विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी करणार : देवेंद्र फडणवीस 

मृणालिनी नानिवडेकर 
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

भाजप आणि शिवसेना एकत्र लढलो  तर सहज विजय मिळेल. मात्र आमची युती झाली नाही, तरीही भाजप सगळ्यात जास्त जागा जिंकेल.

- देवेंद्र फडणवीस

मुंबई :  महाराष्टाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वी होणार असल्याची माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडक पत्रकारांना दिली.

" शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत  युती व्हावी अशी माझी  इच्छा आहे . शिवसेना आणि आम्ही भाऊ - भाऊ आहोत ,त्यामुळे आम्ही भांडलो तरी एकत्र राहू .भाजप आणि शिवसेना एकत्र लढलो  तर सहज विजय मिळेल. मात्र आमची युती झाली नाही   तरीही भाजप सगळ्यात जास्त जागा जिंकेल ," असे मुख्यमंत्री फडणवीस एका प्रश्नाच्या उत्तरात बोलताना  म्हणाले.

जलयुक्तशिवार योजना विरोधकांना कळली नाही असा आरोप करून  मुख्यमंत्री फडणवीस  म्हणाले ," जुनी आकडेवारी काढून यासंदर्भात  काही बोलणे उचित नाही.प्रत्यक्ष गावात गेल्यावर जलयुक्तशिवारचे यश कळेल .यावेळी दुष्काळात पिण्याच्या पाण्याची  अनुपलब्धतता ही समस्या ठरेल असे जाणवते आहे.मात्र शासन त्याचा सामना करेल.तयारी सुरु आहे.जनतेला दिलासा देवू." 

संबंधित लेख