C. M . transfers 11 I. A.S. officers | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत
हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी घेणार तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट
राजस्थानमध्ये काॅंग्रेस 91 तर भाजप 70 जागांवर आघाडीवर
रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजिनामा
अहमदनगर निकाल - भाजप - 14, शिवसेना - 22, राष्ट्रवादी - 20, कॉंग्रेस - 5, बसप - 4, सपा - 1, अपक्ष - 2
मराठा आरक्षण विरोधी याचिका दाखल करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई हायकोर्ट परिसरात हल्ला
ब्रम्हपुरी नगरपरिषद- नगराध्यक्ष पदासाठी निवडून आलेल्या काँग्रेसच्या उमेदवार सौ. रिताताई दीपक उराडे यांचा ८०२० मतांनी विजय
रिसोड नगरपरिषद - नगराध्यक्ष पदी जन विकास आघाडीच्या विजयमाला आसनकर विजयी
लोहा नगरपालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत, 17 पैकी 13 जागी भाजप विजयी, नगराध्यक्ष पदासाठी भाजप उमेदवार विजयी, काँग्रेस चार जागी विजयी

मुख्यमंत्र्यांनी केल्या ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 26 एप्रिल 2017

साखर आयुक्त असलेले विपिन शर्मा यांची कौशल्य विकास विभागाच्या आयुक्त पदावर केलेली नियुक्ती रद्द करून त्यांना शिक्षण विभागाच्या आयुक्त पदावर पाठविण्यात आले असून या पदावर असलेले धीरज कुमार हे प्रतिनियुक्तीवर उत्तर प्रदेशात जाणार आहे. सोलापूर जि प सीईओ अरुण डोंगरे यांची नांदेडच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती केली असून या ठिकाणी नियुक्त केलेले अकोला येथील जिल्हाधिकारी जि श्रीकांत यांची लातूर जिल्हाधिकारी पदावर सुधारित नियुक्ती आदेश जाहीर केले आहे.

मुंबई, ता.२६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी तब्बल ६० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांचे आदेश जाहीर केले असतानी बुधवारी पुन्हा ११ सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्ती आदेशात फेरबदल करून नव्याने आदेश जाहीर केले आहे. 

मागील आदेशात जळगाव जि.प. सीईओ पदावर पाठविलेले एस जी कोलते यांची नागपूर येथील मनरेगाच्या आयुक्त म्हणून सुधारित नियुक्ती आदेश जाहीर केले आहे. तर गडचिरोलीचे सहायक जिल्हाधिकारी व एटापल्ली प्रकल्प अधिकारी म्हणून असलेले विपिन इटनकर यांची गडचिरोलीच्या प्रकल्प अधिकारी पदावर नियुक्ती केली आहे.

 साखर आयुक्त असलेले विपिन शर्मा यांची कौशल्य विकास विभागाच्या आयुक्त पदावर केलेली नियुक्ती रद्द करून त्यांना शिक्षण विभागाच्या आयुक्त पदावर पाठविण्यात आले असून या पदावर असलेले धीरज कुमार हे प्रतिनियुक्तीवर उत्तर प्रदेशात जाणार आहे. सोलापूर जि प सीईओ अरुण डोंगरे यांची नांदेडच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती केली असून या ठिकाणी नियुक्त केलेले अकोला येथील जिल्हाधिकारी जि श्रीकांत यांची लातूर जिल्हाधिकारी पदावर सुधारित नियुक्ती आदेश जाहीर केले आहे.

 बीड जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती केलेले मनारेगा आयुक्त अभय महाजन यांची अहमदनगर जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती केली आहे.सोलापूर जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांची मार्केटिंग विभागाच्या संचालक पदावर पाठविण्यात आले असून त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य कृषी विपणन व्यवस्थापनाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.सांगली जि प चे सीईओ आर बी भोसले यांची सोलापूर जिल्हाधिकारी पदावर पाठविण्यात आले असून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्रालयात असलेले उपसचिव रुपेश जयवंशी यांना मालेगाव मनपाच्या आयुक्त पदावर पाठविण्यात आले आहे. देवेंद्र सिंग यांच्या लातूर जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती केलेले आदेश रद्द करून बीड  जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती केली आहे.गडचिरोली येथील सहायक जिल्हाधिकारी आणि गडचिरोली आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती केली आहे. 

संबंधित लेख