bulett train palgha appose news | Sarkarnama

"बुलेट ट्रेन हटावो, लोकल ट्रेन सुधारो' 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ड्रीम प्रोजेक्‍ट असलेल्या बुलेट ट्रेनच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी साबरमतीमध्ये पार पडला असतानाच इकडे मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील पालघर जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी संस्थांनी या बुलेट ट्रेनला विरोध दर्शविला. "बुलेट ट्रेन हटावो, लोकल ट्रेन सुधारो ' अशा जोरदार घोषणा देत वसई रोड रेल्वेस्थानकावर पर्यावरणसंवर्धन समिती व आदिवासी एकता परिषदने निदर्शने केली. 

बुलेट ट्रेन ऐवजी पालघर जिल्ह्यातील गोरगरीब, आदिवासी व कष्टकरी जनतेसाठी महत्त्वाच्या असलेली उपनगरीय रेल्वेसेवा सुधारा, बुलेट ट्रेन नको अशा मागणीचे फलक यावेळी झळकविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात व महाराष्ट्राच्या भल्यासाठी हा बुलेट ट्रेन प्रकल्प येत्या 5 वर्षात आणणार आहेत. मात्र ही महागडी बुलेट ट्रेन पालघर जिल्ह्यातुन जात असल्याने गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जागा भूसंपादीत केल्या जाणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येईल. हजारो आदिवासी व सामान्य कष्टकरी भूमिपुत्रांना उध्दवस्त करून धनदांडग्यांच्या सोयीसाठी असलेली बुलेट ट्रेन येणार असेल तर ती आम्हाला नको असे निदर्शनकर्त्यांचे म्हणणे आहे. सकाळी 500 आदिवासी व शेतकऱ्यांसह नवघर एसटी डेपोकडे असलेल्या वसई रोड फलाट क्रमांक 1 वर ही निदर्शने करण्यात आली. 

पश्‍चिम रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे नायगाव, वसई, नालासोपारा, विरार या रेल्वेमार्गावर दररोज एक याप्रमाणे वर्षाला साडेतीनशेहूनअधिक प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. हे अपघात पहिले थांबवा. महिलांची सुरक्षा वाढवा. प्लॅटफॉर्मवरील अर्धवट सोयीसुविधा पूर्ण करा. अपघातातील जखमींना सोयीसुविधा द्या. अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. लोकल गाड्या वाढवा. प्रसाधनगृहांच्या सोयी द्या आदी घोषणा यावेळी भूमीपुत्र बचाव आंदोलनकर्त्यांनी दिल्या. "बुलेट ट्रेन हटावो, लोकल ट्रेन सुधारो ' या घोषणाने े स्थानकावरील हजारो प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले. 

संबंधित लेख