buldhana mp election | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

जुने पैलवान दहा वर्षांनंतर पुन्हा लोकसभेच्या आखाड्यात

अरूण जैन
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

बुलडाणा : लोकसभा निवडणुकीतील 2009 मध्ये बुलडाणा मतदारसंघातील कट्टर प्रतिस्पर्धी माजी मंत्री तथा विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे व विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे दोन उमेदवार सध्यातरी 2019 च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेने जवळपास नक्की केलेले आहेत. त्यामुळे हे दोन्ही जुने पैलवान नव्या दमाने मैदानात उतरणार आहेत. 

बुलडाणा : लोकसभा निवडणुकीतील 2009 मध्ये बुलडाणा मतदारसंघातील कट्टर प्रतिस्पर्धी माजी मंत्री तथा विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे व विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे दोन उमेदवार सध्यातरी 2019 च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेने जवळपास नक्की केलेले आहेत. त्यामुळे हे दोन्ही जुने पैलवान नव्या दमाने मैदानात उतरणार आहेत. 

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस लढवित आहे. 2009 च्या निवडणुकीत हा लोकसभा मतदारसंघ खुला झाला आणि शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांचा मेहकर विधानसभा मतदारसंघ राखीव झाला. पहिल्यांदाच खुल्या प्रवर्गासाठीच्या झालेल्या या मतदारसंघात जिल्ह्यातील दोन्ही हेविवेट नेते शिंगणे-जाधव मैदानात उतरले. डॉ. शिंगणे निवडणूक हरले तरी ते सिंदखेडराजा विधानसभेतून पुन्हा आमदार होतील पण प्रतापरावांना घरीच बसावे लागेल अशी वातावरणनिर्मिती करण्यात आली. त्याचा फायदाही प्रतापराव जाधव यांनाच झाला अन्‌ डॉ. शिंगणे लोकसभेत पराभूत झाले तरी अंदाजानुसार विधानसभेच्या रिंगणात विजयी ठरले. 

मात्र 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने माजी आमदार कृष्णराव इंगळे यांना निवडणूक लढविण्याची संधी दिली. सामाजिक समीकरणात हा उमेदवार फिट्ट बसत असला तरी मोदी लाटेच्या तडाख्यातून राष्ट्रवादी सावरू शकली नाही. आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने सामंजस्यातून डॉ. शिंगणे यांना पुन्हा मैदानात उतरविण्याचे ठरविले आहे. शिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील विद्यमान खासदारच 2019 ची लोकसभा लढतील असे ठरविले आहे. त्यामुळे आघाडी व शिवसेनेने आपली भूमिका जवळपास नक्की केली आहे. राहिला प्रश्न शिवसेनेच्या भाजपबरोबर युतीचा तर याबाबत दररोज वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. युती झाली तरीही विद्यमान खासदार असल्याने जागा शिवसेनेच्याच ताब्यात राहिल. 

या सगळ्यात भारिप बहुजन महासंघाचीही भूमिका स्पष्ट व्हायची आहे. सध्या 10 वर्षांनंतर उमेदवार जरी तेच असले तरी परिस्थितीत मात्र बरेच बदल झालेले आहेत. कोणतीही लाट सध्या तरी दृष्टीपथात नाही. त्यामुळे शिवसेनेच्या राज्यातील सर्वच उमेदवारांनी युती व्हावी यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. तीच परिस्थिती बुलडाण्यातही आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने कॉंग्रेसही यावेळी एकदिलाने काम करण्याच्या मूडमध्ये दिसते. एकंदरीत 10 वर्षांनंतर पुन्हा एकमेकांच्या विरोधात लढण्यासाठी तयार होत असलेल्या या पैलवानांसोबत आणखी काय घडामोडी घडतात आणि आगामी सहा महिन्यात परिस्थिती कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

संबंधित लेख