भाजप-कॉंग्रेस म्हणजे "चोर-चोर मौसेरे भाई' : वामन मेश्राम 

आधी कॉंग्रेसने मशीनमध्ये घोटाळे करून निवडणुका जिंकल्या. ही बाब भाजपला माहिती पडल्यानंतर त्यांनीही कॉंग्रेसशी संगनमत करून 2014 ची निवडणूक जिंकली. यामुळेच मोदी छातीठोकपणे 2024 पर्यंत आपणच पंतप्रधान असल्याचे सांगतात. ही जनतेच्या डोळ्यात धुळफेक आहे. हे दोन्ही पक्ष म्हणजे "चोर-चोर मौसेरे भाई' असल्याची टीका बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी केली.
भाजप-कॉंग्रेस म्हणजे "चोर-चोर मौसेरे भाई' : वामन मेश्राम 

बुलडाणा : आधी कॉंग्रेसने मशीनमध्ये घोटाळे करून निवडणुका जिंकल्या. ही बाब भाजपला माहिती पडल्यानंतर त्यांनीही कॉंग्रेसशी संगनमत करून 2014 ची निवडणूक जिंकली. यामुळेच मोदी छातीठोकपणे 2024 पर्यंत आपणच पंतप्रधान असल्याचे सांगतात. ही जनतेच्या डोळ्यात धुळफेक आहे. हे दोन्ही पक्ष म्हणजे "चोर-चोर मौसेरे भाई' असल्याची टीका बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी केली. 

बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हास्तरीय संविधान गौरव दिन कार्यक्रमासाठी श्री. मेश्राम बुलडाण्यात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला हजरत मौलाना, ऑल इंडीया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे जनरल सेक्रेटरी उमरेन महफुज रहमानी उपस्थित होते. यावेळी श्री. मेश्राम म्हणाले, की मतदान प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा होत असल्याचे सबळ पुरावे आपल्याकडे आहेत. शिवाय या मशीनच्या माध्यमातून होणारे मतदान निपक्ष, पारदर्शक आणि विश्‍वासहार्य असू शकत नसल्याचे खुद्द न्यायालयाने मान्य केले आहे. 

आज ज्या संविधानावर आपण अंमलबजावणी करतो ते संविधान 26 नोव्हेंबर रोजी लिखीत स्वरूपात तयार झाले होते. मात्र 26 जानेवारी 1950 ला ते लागू करून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. मात्र ज्या दिवशी ते स्वीकृत झाले तो दिवसही संविधान गौरव दिन म्हणून साजरा करावा, ही भावना आहे. यानिमित्ताने बुलडाण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. घटनेची अंमलबजावणी व्हावी असे मानणाऱ्यांचा एक वर्ग आहे व ही घटना मान्य नसणाऱ्यांचा एक वर्ग आहे. मात्र जगात आदर्श ठरलेल्या आपल्या राज्यघटनेची अंमलबजावणी आपल्या देशात काळजीपूर्वक केली जात नाही किंवा होऊ दिली जात नाही ही खंत आहे. त्यामुळे या अंमलबजावणीची समिक्षा व्हावी असे मानणाऱ्यांपैकी आपण आहोत. 

येत्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडी झाली तर भाजपची पंचाईत होणार आहे. कारण भाजपकडे जेमतेम 37 टक्के मते आहेत. उर्वरीत 63 टक्के मतदान असणारे राजकीय पक्ष एकत्र आल्यास सरकारची निश्‍चितच कोंडी होणार आहे. आपण मात्र या सरकारच्या विरोधात भूमीका घेणार असल्याचे मेश्राम यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com