Buldana : Swabhimani shetkari sanghatna andolan | Sarkarnama

बुलडाणा : उपनिबंधक कार्यालयात ‘स्वाभिमानी’ चे ठिय्या अांदाेलन

सरकारनामा ब्युराे
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

अकाेला  :  संग्रामपुर येथील तूर घाेटाळ्यात निष्पाप शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून खऱ्या दाेषींना पाठिशी घातल्याच्या प्रकरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी अाक्रमक भुमिका घेत बुधवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ठिय्या अांदाेलन केले. 

दाेषींवर गुन्हे दाखल हाेईपर्यंत कार्यालयातून हलणार नाही, असा इशारा रविकांत तुपकर यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी दिला अाहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपुर येथील तूर खरेदी केंद्रावर अनेक घाेळ झाले अाहेत. याबाबत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते प्रशांत डिक्कर यांनी वेळोवेळी अनेक तक्रारी केल्या. मात्र या घोळामध्ये काही बड्यांचा समावेश असल्याने कारवाई टाळली जात असल्याचा अारोप शेतकऱ्यांमधून केला जात अाहे.

 प्रशासन कारवाई करण्यासाठी चालढकल करीत अाहे. वेळोवेळी इशारे देऊनही काहीच होत नसल्याने बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर हे जिल्हा उपनिबंधकांच्या कक्षात ठाण मांडून बसले. 

जोपर्यंत संग्रामपुर येथील तुर घोटाळ्यातील दोषीवर एफअायआर दाखल करीत नाही तोवर कार्यालय सोडणार नाही, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या अांदोलनामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात एकच गोंधळ उडाला. प्रशासनाने दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली न केल्याने रात्री अखेर रविकांत तुपकर यांच्यासह शेतकर्यांनी कार्यालयातच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.

संबंधित लेख