Build 3 bridges for us : Mayor requests military establishment | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

लष्कराने महापालिकेला तीन  पुलांसाठी मदत करावी - नंदकुमार घोडेले 

सरकारनामा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

शहरातील तीन ऐतिहासिक पुलांना पर्याय उभे करण्यासाठी लष्कराने महापालिकेला मदत करावी .-नंदकुमार घोडेले

औरंगाबादः महापालिकेची आर्थिक स्थिती हालाखीची आहे. मुंबईत लष्कराने आपत्कालीन परिस्थीतीत पुल उभारणी करुन दिली. या धर्तीवर शहरातील तीन ऐतिहासिक पुलांना पर्याय उभे करण्यासाठी लष्कराने महापालिकेला मदत करावी ,अशी विनंती महापौर नंदकुमार घोडेले यांनी लष्कराकडे केली. 

मंगळवारी (ता. 14) शहरातील छावणी परिसरात रणगाड्याच्या लोकार्पण कार्यक्रमास घोडेले यांनी हजेरी लावली त्यावेळी ही मागणी करण्यात आली. सोमवारी ट्रकच्या धडकेने बारापुल्ला दरवाज्याचे चिरे ढासळले, मात्र सुदैवाने त्यात जिवीत हानी झाली नाही. या दरवाज्यांलगत असलेल्या पुलांनी आपल्या आयुष्याची तीनशे वर्षे पुर्ण केली आहेत. 

या पुलांसाठीचे सगळे कागदोपत्री सोपस्कार पुर्ण करुन महापालिकेने राज्य सरकारकडे निधीसाठीचा प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव काही पुढे सरकण्याचा नाव घेईना. राज्य सरकारनेही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महापालिकेने अन्यत्र कुठुन निधी मिळतो का याची चाचपणी सुरु केली. शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी महापौरांना लष्कराकडे अशी मागणी करण्याचे सूचवले होते. 

याचा संदर्भ देत घोडेले म्हणाले, मी आपणास पत्र लिहले होते पण ते आपल्यापर्यंत पोहोचले नसावे. या तीन पुलांना मुंबईत लष्कराने केलेल्या मदतीच्या धर्तीवर सहाय्य करावे अशी विनंती नंदकुमार घोडेले यांनी यावेळी केली. 

औरंगाबाद महापालिकेची आर्थिक परिस्थिती हालाखिची असताना महापालिकेकडे 'मागणारे'च कायम येतात. मंगळवारी मात्र उलटे घडले, महापालिकेला कोणीतरी काहीतरी देणारा भेटला अशा शब्दात महापौर घोडेले यांनी लष्कराने दिलेल्या रणगाड्यासाठी आभार मानले. या रणगाड्याच्या देखभालीची जबाबदारी आपली असुन ती महापालिकेने आनंदाने स्विकारली असल्याचे घोडेले यांनी यावेळी नमुद केले.

संबंधित लेख