buget session | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत
हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी घेणार तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट
राजस्थानमध्ये काॅंग्रेस 91 तर भाजप 70 जागांवर आघाडीवर
रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजिनामा
अहमदनगर निकाल - भाजप - 14, शिवसेना - 22, राष्ट्रवादी - 20, कॉंग्रेस - 5, बसप - 4, सपा - 1, अपक्ष - 2
मराठा आरक्षण विरोधी याचिका दाखल करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई हायकोर्ट परिसरात हल्ला
ब्रम्हपुरी नगरपरिषद- नगराध्यक्ष पदासाठी निवडून आलेल्या काँग्रेसच्या उमेदवार सौ. रिताताई दीपक उराडे यांचा ८०२० मतांनी विजय
रिसोड नगरपरिषद - नगराध्यक्ष पदी जन विकास आघाडीच्या विजयमाला आसनकर विजयी
लोहा नगरपालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत, 17 पैकी 13 जागी भाजप विजयी, नगराध्यक्ष पदासाठी भाजप उमेदवार विजयी, काँग्रेस चार जागी विजयी

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सुप वाजले

ब्रह्मदेव चट्टे : सरकारनामा न्यूज ब्युरो
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

मुंबई : विरोधकाविनाच विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाचे आज सुप वाजले. कर्जमाफीच्या मुद्द्यावर घातलेल्या गोंधळामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या १९ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार घातला होता.आज या आमदारांचे निलबंन मागे घेण्यात आले तरीही विरोधांचा बहिष्कार सुरूच होता. विधानसभेच्या कामकाजात सहभाग घेतलेल्या सर्वाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आभार मानले. या पुढचे पावसाळी अधिवेशन २९ जुलै २०१७ रोजी होणार असल्याचेही अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाहिर केले.

शेतकऱ्याच्या कर्जमाफीवरून विधानसभेत अभूतपुर्व गोंधळ झाला होता. याकाळात विधानसभा काजकाज सुरळीत पार पडवे म्हणून अध्यक्षांनी गटनेतेच्या एकूण २० बैठक घेतल्या. विधानसभेचे एकूण कामकाज कालावधी ७८ तास ४२ मीनीट तर होवू न शकलेले कामकाज कालावधी १३ तास ३९ मिनीटे आहे. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ मार्च २०१७ रोजी सुरू झाले होते. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सरासरी दररोज ३ तास ५५ मिनीटे कामकाज झाले.
यावेळी विधीमंडळ कामकाज कार्यालयाकडे १० हजार ५५१ प्रश्नांपैकी ७२२ प्रश्न स्विकारण्यात आले. त्यापैकी ७७ प्रश्नाची तोंडी उत्तरे देण्यात आली. याकाळात विधानसभेत ५ अल्प सुचना सदस्यांनी सुचवल्या त्यापैकी १ सुचनेचा स्विकार करण्यात आला. विधानसभेत विचारण्यासाठी विधानभवन कार्य़ालयाकडे २७५२ लक्षवेधी सुचना आल्या होत्या. त्यापैकी ८८ लक्षवेधी पुकारण्यात आल्या. त्यापैकी ३३ लक्षवेधीवर विधानसभेत चर्चा करण्यात आली. विधानसभेमध्ये २८ विधयके सादर करण्यात आली. यापैकी ११ विधेयके संमत करण्यासाठी विधान परिषदेत पाठवण्यात आली. विधानसभेच्या कामकाजाच्या काळात नियम २९३ अन्वये २ प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. यावर विधानसभेत चर्चा करण्यात आली. विधानसभेत सदस्यांची एकूण उपस्थिती ७६. ३३ टक्के होती. सदस्यांची कमाल उपस्थिती ८७. ४९ टक्के तर किमान उपस्थिती ५०. ५८ टक्के होती.

संबंधित लेख