budhajirao mulik about udyanraje | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

मोदींपेक्षा जास्त मते उदयनराजेंना पडली पाहिजेत!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 मार्च 2019

प्रश्‍न जय पराजयाचा नाही तर तत्वाचा व या भागाच्या प्रगतीचा आहे. -उदयनराजे

सातारा : 'माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. माझा संबंध फक्त उदयनराजेंशी आहे. उदयनराजे ही व्यक्ती नसून संस्था आहे, असे कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी सांगितले. 

हॉटेल कल्याण रिसॉर्ट येथे झालेल्या उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

मुळीक म्हणाले, काश्‍मीर ते कन्याकुमारीपर्यंत आदरयुक्त दहशत आहे, ती केवळ उदयनराजेंचीच. त्यामुळे त्यांना साताऱ्यापुरते मर्यादीत ठेऊ नका. शिवरायांचे तेरावे वंशज म्हणून उदयनराजेंना लोकसभेवर बिनविरोध निवडून द्या. त्यांना विरोध म्हणजे शिवरायांना विरोध होय. आज जर ते महाराष्ट्रभर फिरले तरी सगळे पक्ष हलतील. म्हणूनच त्यांनी कधीतरी महाराष्ट्र पिंजून काढावा. कारण या एकाच माणसामध्ये दम आहे. त्यामुळे त्यांना बिनविरोध निवडुन आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. कारण वंचितांना न्याय देणारा त्यांच्याशिवाय दुसरा कोणी नेता नाही. पंतप्रधानांनाही पडणार नाहीत त्यापेक्षा जास्त मते उदयनराजेंना पडली पाहिजेत.  

उदयनराजे म्हणाले, प्रश्‍न जय पराजयाचा नाही तर तत्वाचा व या भागाच्या प्रगतीचा आहे. लोकशाहीत प्रत्येकाला उमेदवारी जाहिर करणचा अधिकार आहे. पण मी विचार करतो की मला निवडुन कशासाठी आणि का द्यायचे. बाकीच्यांना का निवडुन द्यायचे नाही. कारण मी आजपर्यंत समाजकारण केले. ते जनतेच्या व जिल्ह्याच्या कल्याणासाठी, सर्व सामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करत आहे. माझ्यापेक्षा एखादा जास्त हित जोपासून प्रगती करू शकत असेल तर मला सांगा मी माझी उमेदवारी जाहिर न करता त्या व्यक्तीचा प्रचार करण्यास तयार आहे.  

संबंधित लेख