buchake and adhalrav patil | Sarkarnama

आढळरावदादांनी मंत्री व्हावे - आशाताई बुचके यांनी भाऊबीजेला व्यक्त केली इच्छा

उत्तम कुटे
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

पिंपरी : शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी खासदारकीचा विजयी चौकार मारून आता केंद्रात मंत्री व्हावे, अशी भावना पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांनी भाऊबीजेनिमित्त शुक्रवारी व्यक्त केली. ही मलाच नव्हे, तर, शेतकरी, महिला आणि बैलगाडामालकांना भाऊबीजेची खरी ओवाळणी असेल असे त्यांनी आढळराव यांचे भाऊबीजेला औक्षण केल्यानंतर "सरकारनामा'ला सांगितले. 

आढळराव व आशाताई या मानलेल्या बहिणभावांचे नाते सख्यांइतके वा त्यापेक्षाही घट्ट आहे. त्यांच्या भाऊबीज व रक्षाबंधनाचे वैशिष्ट म्हणजे हे दोघेही आपल्या सख्या बहीण, भावाअगोदर हे दोन्ही सण साजरे करतात. आढळरावदादांना सख्खी बहीण, तर आशाताईंनाही सख्खा भाऊ आहे. मात्र, रक्षाबंधनाला आशाताई प्रथम आढळरावदादांना राखी बांधतात, नंतर आपल्या सख्या भावाला. हाच कित्ता त्या भाऊबीजेलाही गिरवितात. गेले एक तप हा परिपाठ चुकलेला नाही. 2004 मध्ये आढळराव राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले. तेव्हा जिल्हा परिषद सदस्या असलेल्या बुचके यांनी त्यांना आपला भाऊ मानले. दोघांनीही हे नाते निभावलेही आहे. 

बुचके यांची जिल्हा परिषद सदस्य म्हणून ही चौथी टर्म आहे. त्या राज्यातील एकमेव अशा जिल्हा परिषद सदस्य आहेत, की, प्रत्येकवेळी त्या नवीन मतदारसंघातून (गट) निवडून आलेल्या आहेत. आढळरावांची आता खासदारकीची तिसरी टर्म असून चौकार मारण्याच्या तयारीत ते आहेत. त्यामुळेच ही भाऊबीज माझ्यासाठी स्पेशल असल्याचे आशाताई सांगतात. कारण 2019 ला दादांनी चौकार तर मारावाच शिवाय ते मंत्रीही व्हावेत, म्हणून त्यांनी आज विशेष प्रार्थना केली,असे त्या म्हणाल्या. ते मंत्री व्हावेत, हे सर्वसामान्यांचेही स्वप्न असून त्यामुळे शेतकरी, महिला आणि गाडामालकांना न्याय मिळेल, अशी भावना त्यांनी लांडेवाडी (ता. आंबेगाव) मंचर येथे आढळरावांचे भाऊबीजेनिमित्त औक्षण केल्यानंतर व्यक्त केली. आढळरावदादांनी सख्या बहिणीपेक्षा जास्त मान दिल्याचे त्यांनी सांगितले.""म्हणायला वा मानायला म्हणून मी त्यांची छोटी बहिण नाही. तर मी त्यांच्यावर सख्या भावासारखा हक्क दाखविते. ते सुद्धा मला लहान बहिणीसारखे समजून घेतात', असे त्या म्हणाल्या. 

संबंधित लेख