bsp wins 4 seats in nagar | Sarkarnama

नगरमध्ये बसपाच्या हत्तीची दिमाखदार एंट्री!

मुरलीधर कराळे 
सोमवार, 10 डिसेंबर 2018

एका झेंड्याखाली येण्याचा निर्णय योग्य ठरला.

नगर : महापालिका निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचे चार उमेदवार निवडून आले. विशेष म्हणजे एकाच प्रभागातील चारही उमेदवार निवडून येण्याची किमया साधली ती एकच चिन्ह 'हत्ती'मुळे. चारही उमेदवारांनी एकत्रित विचार करून बसपाच्या तिकीटावर उमेदवारी करण्याचे ठरविले. राष्ट्रवादी व शिवसेनेशी जवळीक असली, तरी लोकांना मत देणे सोपे जावे म्हणून त्यांनी हत्ती हेच चिन्ह वापरले. 

त्याला जोडून आधीची विकास कामे व आगोदर नगरसेवक असलेला संपर्कही त्यांच्या कामे आला.
प्रभाग दहामधून बसपाचे अक्षय उनवणे, अश्विनी जाधव, अनिता पंजाबी, मुदस्सर शेख हे विजयी झाले. हा भाग तोफखाना, रामवाडी, सर्जेपुराचा काही भाग असा विस्तारला आहे. सर्वसामान्य व गरीब कुटुंबिय असलेल्या या प्रभागात सर्वसामान्यांत राहून जनसंपर्क ठेवणारा नेता येतो, हे यापूर्वीच्या निवडणुकीतूनही स्पष्ट झाले आहे. तसेच या प्रभागातील नेते भाऊसाहेब उनवने, सचिन जाधव, जसपालसिंग पंजाबी यांनी केलेले कामे या उमेदवारांना विजयी करण्यास कामे आले.

या प्रभागातील पाण्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावला. वीज जोडणी, रस्ते व गटारीचा प्रश्नांवर आवाज उठवून कामे करून घेतली. आम्ही बसपाचे हत्ती या एकाच चिन्हाखाली निवडूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मतदारांना मतदान करणे सोपे झाले. आम्ही आघाडीकडूनही उमेदवारी करू शकत होतो. शिवसेनेशीही आमच्या सहकाऱ्यांचा चांगला संपर्क होता. आम्हीला उमेदवारी इतर पक्षातूनही मिळू शकली असती, पण एका झेंड्याखाली येण्याचा निर्णय योग्य ठरला, असे नवोदित नगरसेवक मुदस्सर शेख यांनी  सांगितले. 

संबंधित लेख