BSP will fight assembly elections in Rajasthan and Madhya Pradesh on its own : Mayawati | Sarkarnama

मायावतींचा कॉंग्रेसला झटका; राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये बसप स्वतंत्र निवडणुका लढवणार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

बहुजन समाज पक्षाने राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांत येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांत स्वतंत्रपणे उतरण्याचा निर्णय आज जाहीर केला. या निवडणुकांसाठी कॉंग्रेसबरोबर आघाडी केली जाणार नाही, असे पक्षप्रमुख मायावती यांनी आज स्पष्ट केले. 

पुणे : बहुजन समाज पक्षाने राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांत येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांत स्वतंत्रपणे उतरण्याचा निर्णय आज जाहीर केला. या निवडणुकांसाठी कॉंग्रेसबरोबर आघाडी केली जाणार नाही, असे पक्षप्रमुख मायावती यांनी आज `एएनआय'शी बोलताना स्पष्ट केले. 

कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवताना मायावती म्हणाल्या, की 
कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आमच्याबरोबर आघाडी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. मात्र दिग्विजयसिंहांसारखे कॉंग्रेसचे नेते ही आघाडी होण्याविरुद्ध आहेत. ईडी, सीबीआयला ते घाबरत आहेत. 

भाजपप्रमाणेच कॉंग्रेसही आम्हाला संपवण्याचा कट करत आहे. त्यामुळे कॉंग्रेसची चाल मस्तवाल झाली आहे. भाजपला ते स्वतः हरवू शकतात, असा कॉंग्रेसचा समज झाला आहे. परंतु, कॉंग्रेसच्या चुकांना आणि भ्रष्टाचाराला जनता केव्हाही माफ करणार नाही. कॉंग्रेसही आपली चूक स्वतःहून सुधारण्याची सुतराम शक्यता नाही, असेही त्या म्हणाल्या.

संबंधित लेख