branding from social mediya | Sarkarnama

लोकसभा, विधानसभेसाठी इच्छुकांचे सोशल मिडियाद्वारे ब्रॅंन्डींग

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 जुलै 2017

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी दीड तर विधानसभेसाठी दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असतांना इच्छुकांनी आतापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. यासाठी सोशल मिडियाचा आधार मोठ्या प्रमाणावर घेतला जात आहे. पुस्तक रुपात प्रकाशित केल्या जाणाऱ्या कार्य अहवालापासून फेसबुकवर व्हिडीओच्या माध्यमातून स्वकर्तृत्वाचे गुणगाण करतांना हे इच्छुक दिसत आहेत. शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्ष देखील यात आघाडीवर आहेत. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे बोलले जाते. त्यादृष्टीने कॅम्पेनिंगचा भाग म्हणून तयार करण्यात आलेला त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. यात दानवे यांनी केलेली आंदोलन, मेळावे, गावसभा, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नोंदवलेला सहभाग, पोलिसांच्या अंगावर झेललेल्या काठ्या आदींच्या फोटोंचा समावेश करण्यात आला आहे. लोकनेता या नावाने 40 ते 50 सेकंदाची ही व्हिडीओ क्‍लीप फेसबुकवरून व्हायरल केली जात आहे. दानवे समर्थकांकडून त्याला भावी आमदार, भावी खासदार अशा पोस्ट टाकून प्रोत्साहन दिले जात आहे. 

भाजप इच्छुकाने कापला भावी आमदार लिहलेला केक 
औरंगाबाद पुर्व मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या व कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या संजय केणेकर यांचा काल वाढदिवस साजरा झाला. यावेळी त्यांच्या उत्साही समर्थकांनी "पुर्व भावी आमदार' अशी अक्षरे लिहलेला केक कापत आपल्याच पक्षाच्या विद्यमान आमदार अतुल सावे यांना धक्का दिला. सावे हे पुर्व मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. 2019 मधील निवडणुकीत देखील पुर्व मधून दुसऱ्यांदा लढण्यास ते इच्छुक आहेत. कार्यकर्ता काळापासून सावे, केणेकर मित्र. परंतु पुर्व भावी आमदार लिहलेला केक तो ही त्यांच्या समक्षच कापण्यात आल्याने सावे नाराज होऊन निघून गेले. 

संबंधित लेख