चंद्रपूर जिल्ह्यातील मुनगंटीवारांच्या प्रभावाला ग्रहण?

गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील राजकारण सुधीर मुनगंटीवार यांच्याभोवती फिरत आहे. केंद्रीय मंत्री हंसराज अहीर गेल्या 15 वर्षांपासून खासदार असले तरी भाजपचा चेहरा म्हणून सुधीर मुनगंटीवार हेच ओळखले जातात. जिल्ह्यातील राजकारणावर त्यांचा प्रभाव राहिला आहे. ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या निकालाने या प्रभावावर आता प्रश्‍नचिन्ह उमटले आहे.
Vijay Vadettiwar - Sudhir Mungantiwar
Vijay Vadettiwar - Sudhir Mungantiwar

नागपूर : गेल्या 27 वर्षांपासून एकहाती सत्ता राहिलेल्या ब्रम्हुपरी नगरपरिषदेवर काँग्रेसने कब्जा केल्याने चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यातील प्रभावाला ग्रहण लागल्याचे बोलले जात आहे. 

गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील राजकारण सुधीर मुनगंटीवार यांच्याभोवती फिरत आहे. केंद्रीय मंत्री हंसराज अहीर गेल्या 15 वर्षांपासून खासदार असले तरी भाजपचा चेहरा म्हणून सुधीर मुनगंटीवार हेच ओळखले जातात. जिल्ह्यातील राजकारणावर त्यांचा प्रभाव राहिला आहे. ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या निकालाने या प्रभावावर आता प्रश्‍नचिन्ह उमटले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, नवरगाव, भीसी या भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चांगले जाळे विणले आहे. भाजपचे माजी प्रदेश संघटनमंत्री रविंद्र भुसारी हे ब्रम्हपुरी येथील आहेत. रविंद्र भुसारी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मतभेद झाल्याने राजीनामा द्यावा लागला होता. संघ परिवाराच्या प्रभावामुळे ब्रम्हपुरी नगरपरिषदेवर भाजपचे सातत्याने वर्चस्व राहिले होते. 

संघ परिवारातील अतुल देशकर यापूर्वी ब्रम्हपुरी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. या मतदारसंघात विजय वडेट्टीवार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत अतुल देशकर यांचा पराभव केला होता. तेव्हापासून विजय वडेट्टीवार यांनी संघाचा प्रभाव असलेल्या क्षेत्रात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न चालविले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी भाग सर्वोत्कृष्ट तांदूळ उत्पादन करणारा भाग आहे. या भागातच मोठ्या तांदूळ व पोहे तयार करणाऱ्या गिरण्या आहेत. ब्रम्हपुरीचा विजय हा काँग्रेससाठी मोठा बुस्टर डोस ठरणार असून सुधीर मुनगंटीवार यांच्या एकहाती वर्चस्वाला निश्‍चितपणे धक्का लागल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com