दोन्ही काँग्रेस कम्युनिस्टांना दिंडोरी तर सपाला उत्तर मध्य मुंबई देण्यास तयार ? 

नोव्हेंबर अखेरीस उमेदवार निश्‍चित करून प्रचारास लागावे असा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी घेतलेला निर्णय आहे.कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सतत संपर्कात आहेत.
congress_ncp
congress_ncp

मुंबई  : लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी मते एकत्र यावीत यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना महाराष्ट्रात मूर्त रूप देत दिंडोरी हा लोकसभा मतदारसंघ सीपीएम साम्यवादी आघाडीला तर मुंबईतील उत्तर मध्य समाजवादी पार्टीला देण्याच्या प्रस्तावावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये एकमत झाले आहे, असे समजते . 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी आघाडी उभी करणे मतदारांसमोर सक्षम पर्याय उभा करण्यासाठी आवश्‍यक असल्याचे मान्य करीत दोन्ही पक्षांनी हा निर्णय घेतला . लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांना जागावाटपात न्याय्य वाटा दिल्यास विधानसभा निवडणुकीसाठी योग्य वातावरण निर्माण होईल असे मानले जाते .

 भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी 12 जागांची  मागणी केली आहे . ही मागणी दोन्ही काँग्रेस पक्षांना अवास्तव वाटते .मात्र त्यांच्याशीही चर्चा सुरू ठेवली जाईल.  

कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसला समसमान जागा देण्याचा प्रस्ताव मात्र अमान्य झाला असून कॉंग्रेसने 27 जागांवर हक्‍क सांगितला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आज 5 खासदार असले तरी परिस्थिती बदलली असल्याचा कॉंग्रेसचा दावा आहे. अर्थात जागावाटपाचे सूत्र कोणत्याही परिस्थितीत निश्‍चित केले जाईल .आघाडीनेच मतदारांना सामोरे जाण्याचा निर्णय सर्वोच्च पातळीवर घेतला गेला आहे असेही दोन्ही पक्षातील नेत्यांनी नमूद केले. 

अहमदनगर या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसला सलग तीनवेळा पराभव पत्करावा लागला. तो कॉंग्रेसला डॉ.सुजय विखे पाटील यांच्यासाठी हवा आहे. कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांना यवतमाळमधून नशीब अजमावयचे आहे.त्यासाठी कॉंग्रेसने यवतमाळची मागणी केली आहे. 

रावेर मतदारसंघ आम्हाला दयावा असे कॉंग्रेस म्हणते. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही बदललेल्या परिस्थितीत पुणे, औरंगाबाद हे काँग्रेसचे  मतदारसंघ आमच्याकडे सोपवा असा आग्रह धरला आहे. 

 राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी करताना ठामपणे युक्‍तीवाद व्हावा यासाठी कॉंग्रेसचे सर्व प्रमुख नेते तब्बल दोन दिवस चर्चा करीत होते असे समजते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चर्चा अत्यंत योग्यप्रकारे झाली  आहे, तपशील योग्यवेळी जाहीर करण्यात येईल एवढेच   सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com