bogus voting vinod tawade | Sarkarnama

बोगस मतदार नोंदणी करणाऱ्यांवर कारवाई करणार : तावडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

मुंबईः शिक्षक व पदवीधर मतदारसंघात बोगस मतदारनोंदणी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आश्‍वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.

मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रशांत रमेश रेडीज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली. त्या वेळी तावडे म्हणाले, ""शिक्षण क्षेत्रात कोणीही गलिच्छ राजकारण करू नये. चुकीचा पत्ता देऊन जबरदस्तीने कोणी मुख्याध्यापकांवर दबाव आणून चुकीची मतदार नोंदणी करीत असेल, तर त्याच्या दबावाला मुख्याध्यापकांनी बळी पडू नये. त्यासाठी सरकार तुम्हाला मदत करेल. प्रसंगी माझ्याशी थेट संपर्क करावा.''

शिक्षक मतदारसंघात निवडून येणारे प्रतिनिधी अनेक वेळा शिक्षण क्षेत्राशी संबंधित नसतात. ज्या हेतूने हे मतदारसंघ निर्माण केले आहेत, तेच साध्य होत नसेल, तर हे मतदारसंघ व आमदार हवेत कशाला, अशी भूमिका मुख्याध्यापक संघटनेने मांडली होती.
 
संबंधित लेख