राणे समर्थकांना राजकारणात काय मिळणार?

राणे समर्थकांना राजकारणात काय मिळणार?

माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वारे जोरात वाहू लागले आहेत. निलेश राणे आणि कालीदास कोळंबकर त्यांच्यासोबत काँग्रेस सोडण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी त्यांनी दहा आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या आमदारांचे वैयक्तीक 'भले' झाल्याचे बोलले जाते. मात्र त्यांची राजकीय कारकीर्द कधीच बहरली नाही हे वास्तव आहे. त्यामुळे या पक्षांतरानंतर पुन्हा एकदा राणे समर्थकांना काय मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे.

नारायण राणेंची आक्रमक नेते अशी ख्याती आहे. सर्वोच्च पदी जाण्याची त्यांची महत्वाकांक्षा लपुन राहिली नाही. मात्र, उध्दव ठाकरे यांना शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष नेमले जात असताना त्यांनी थेट उध्दव ठाकरेंवरच टिकास्त्र सोडले होते. त्यामुळे त्यांचे भावी आडाखे ओळखून 2 जुलै, 2005 मध्ये त्यांना शिवसेनेतून बडतर्फ करण्यात आले. ऑगस्ट, 2005 मध्ये त्यांनी मुंबईत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश केला. 16 ऑगस्टला ते राज्याचे महसूलमंत्री झाले. माजी राज्यमंत्री सुरेश नवले, माणिक कोकाटे, सुभाष बने, गणपतराव कदम, विनायक निम्हण, शंकर कांबळे, संदेश पारकर, राजन तेली, प्रकाश भारसाकळे या नऊ आमदारांवर राणे समर्थक असा शिक्का बसला. यातील एकाही आमदाराला पुढे कोणतेही पद अथवा अपेक्षीत राज्यमंत्री पद मिळाले नाही.

महसूल मंत्री राणे यांचे निकटवर्तीय म्हणून जे लाभ पदरात पाडून घेता येतील तेव्हढीच त्यांची पक्षांतराची फलनिष्पत्ती. त्यामुळे राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काग्रेसचे सरकार असतांना हे आमदार सतत अस्वस्थ राहिले. नाशिकचे माणिकराव कोकाटे काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. उमेदवारीसाठी त्यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. पुढे 2005 मध्ये राणेंसोबत शिवसेनेतून काँग्रेसमध्ये स्वगृही परतले. 2014 मध्ये राणेंना सोडून उमेदवारीसाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता भाजपकडून त्यांना नाशिक लोकसभा उमेदवारीची अपेक्षा आहे. अन्य आमदारांचेही असेच झाले आहे.

सुभाष बने, गणपतराव कदम, विनायक निम्हण आता शिवसेनेत स्वगृही परतले आहेत. माजी राज्यमंत्री प्रा. सुरेश नवले राणेंसोबत काँग्रेसमध्येच राहिले. शंकर कांबळी हे दोघे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. राजन तेली यांनी तर सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व लगेचच त्याचा इन्कार करीत भाजपमध्ये प्रवेश केला. राजन तेली, माणिकराव कोकाटे, संदेश पारकर, प्रकाश भारसाकळे हे चौघे राणेंच्या आधीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. श्री. भारसाकळे विदर्भातील भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे राणेंना मंत्रीपद मिळाल्यावर या चौघांना निश्‍चितच आनंद होईल. त्यानिमित्ताने त्यांना पक्षात राजकीय 'गॉडफादर' तयार होईल.

मात्र काँग्रेस आणि भाजप हे दोन्हीही राष्ट्रीय पक्ष आहेत. तिथे सोयीनुसार पक्ष बदलणाऱ्यांना काय स्थान असते हे लपुन राहिलेले नाही. त्यामुळे राणे समर्थक आमदारांची भावी राजकीय वाटचाल किती उज्ज्वल ठरते याविषयी सगळ्यांची उत्सुकता स्वाभाविक आहे. राज्याच्या राजकारणात तो सध्या चर्चेचा विषय आहे.

सरकारनामाच्या अन्य बातम्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com