महाराष्ट्रासाठीही 'गुजरात पॅटर्न' तयार : विरोधी पक्षातील चार नेत्यांवर जाळे?

महाराष्ट्रासाठीही 'गुजरात पॅटर्न' तयार : विरोधी पक्षातील चार नेत्यांवर जाळे?

युद्धात आणि प्रेमात सर्वच क्षम्य असते असे म्हटले जाते. राजकारणातही कुणाचे कुणाशी 'युद्ध' होईल आणि कोण कोणाच्या कधी प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. ऐन निवडणुकीच्या तोंडावर गुजरातचे विरोधी पक्षनेते शंकरसिंग वाघेलायांनी राजीनामा दिला. पाठोपाठ काँग्रेसच्या पाच आमदारांनी भाजपची साथ स्वीकारली. दोघे प्रक्रीयेत आहेत. त्याने भाजप विरोधी राजकीय हवाच निघून गेली......गुजरातचा हाच प्रयोग महाराष्टारातही नियोजित असून त्याची संहिता लिहिली गेली आहे.

न निवडणुकीच्या तोंडावर गुजरातचे विरोधी पक्षनेते शंकरसिंग वाघेलायांनी राजीनामा दिला. पाठोपाठ काँग्रेसच्या पाच आमदारांनी भाजपची साथ स्वीकारली. दोघे प्रक्रीयेत आहेत. त्याने भाजप विरोधी राजकीय हवाच निघून गेली......गुजरातचा हाच प्रयोग महाराष्टारातही नियोजित असून त्याची संहिता लिहिली गेली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांसह चार मोठ्या नेत्यांना गळाला लावण्याचे काम सुरु असल्याची चर्चा भाजप अंतर्गत रंगल्याचे बोलले जाते.

बिहारमध्ये थेट मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीच एका रात्रीत विरोधी संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए)ची संगत सोडून भाजपशी हात मिळवणी केली. असाच प्रयोग गुजरात मध्ये राज्यसभा निवडणूकीच्या तोंडावर झाला. या दोन्ही राज्यांत केंद्रातील भाजप सरकारला राजकीय आव्हान उभे करण्याच्या हालचाली गतिमान होत्या. हे प्रयोग लक्षात घेऊन भाजपने त्यातली हवा काढून घेतली. त्यासाठी कोणते व कसे मार्ग अवलंबले त्याविषयी वाद, राजकीय मतांतरे आहेत.

नागरीकांत रोष आहे. राजकीय विचारसरणी वरचा विश्‍वास घटतो आहे. मात्र केवळसत्ता आणि पदांना महत्त्व देणारे राजकारणी वाढले. त्याचा फायदा भाजपला होतो आहे. विधीमंडळाच्या दालनात फेरफटका मारल्यावर, महाराष्ट्रासाठीही असाच प्रयोग होऊ घातला आहे. त्याची संहिता लिहून तयार आहे. कोणती भूमिका कोण वठवणार हे नक्की झाले आहे. असे चर्चा रंगते आहे. अर्थात यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी सरळ पंगा टाळून पक्ष एकसंध ठेवण्याची व्युहनिती केली आहे. काँग्रेस मात्र पुन्हा एकदा घडामोडींवर फक्त नजर ठेऊन राहणार का? हा प्रश्‍न आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे आपल्या पक्षाच्या अन्य नेत्यांवर नाराज आहेत. त्यांचे पुत्र निलेश राणे यांनी युवक काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ते
भाजप मध्ये जाणार या बातम्या सतत येत असतात. त्या त्यांचे पक्षांतर्गत विरोधक जाणीवपूर्वक पसरवतात असा दावा केला जातो. स्वतः राणे यांनी भाजप प्रवेशाचा वारंवार इन्कार केला आहे. मग तरीही अशी बातम्या का पेरल्या जातात? हा प्रश्‍न शिल्लक राहतोच. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी एका कार्यक्रमात 'भाजपचे मंत्री मला जास्त जवळ वाटतात', अशा आशयाचे विधान केले होते. ते विधान त्यांनी मतदारसंघातील कामांविषयी केल्याचा खुलासा करण्यात आला. मात्र त्यांचे पुत्र सुजय विखे- पाटील सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागेल आहेत. त्यासाठी त्यांनी विविध चित्रफिती, डॉक्‍युमेंट्रीज तयार केल्या आहेत. त्यांचा नगरमध्ये जनसंपर्क सुरु आहे. या दोन्ही नेत्यांसह राज्यातील चार नेत्यांनी भाजपमध्ये यावे यासाठी सरकारी यंत्रणेचा उपयोग केल जात आहे.

त्यांना अप्रत्यक्ष त्रास सुरु झाला की हे नेते हिंमत सोडतील व राज्यात भूकंप होईल असा होरा आहे. हे सर्व प्रत्यक्षात येईल की नाही यासाठी अद्याप
वर्षभराचा कालावधी लागणार आहे. मात्र सर्वच आमदारांत, राजकीय नेत्यांत त्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान याबाबत काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने मात्र ही शक्‍यताच फेटाळली. 'भाजपचे असे प्रयोग लपुन राहिलेले नाहीत. मात्र त्यांनी जे देशात घडवले तसे महाराष्ट्रात अजिबात घडणार नाही. कारण शेतकरी, व्यापारी, नागरीक, गरीब जनता असा एकही घटक खुष नाही. अशा स्थितीत ज्याला राजकीय आत्महत्या करायची असेल तोच भाजपात जाण्याचा विचार करेल. आतापर्यंत एकही आमदार भाजपसोबत गेलेला नाही. भविष्यातही जाणार नाही' असा दावा केला आहे. अर्थात युद्धात आणि प्रेमात सर्वच क्षम्य असते असे म्हटले जाते. राजकारणातही कुणाचे कुणाशी 'युद्ध' होईल आणि कोण कोणाच्या कधी प्रेमात पडेल हे सांगता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com