Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News

ब्लॉग

  निवास चौगले 
'सर्वार्थाने समृध्द, पुरोगामी विचारांचा वारसा चालवणारा जिल्हा' अशी ओळख असलेल्या कोल्हापुरवर राजकीय क्षेत्रातून मात्र नेहमी अन्यायच होत आला आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या राजवटीत कमी महत्त्वाची खाती देऊन बोळवण करण्यात आली. आता तोच कित्ता युती शासनाच्या काळात गिरवला जात आहे. किंबहुना कॉंग्रेस आघाडीपेक्षा जास्त अन्याय युती शासनाने त्यातही विशेषतः शिवसेनेने केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. लोकसभेच्या दोन्हीही आणि... आणखी वाचा
विष्णू सोनवणे 
दलित, शोषित, कष्टकरी, कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर लढणाऱ्या योध्याला अखेर न्याय मिळाला. आंबेडकरी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते आणि भाष्यकार अविनाश महातेकर हे सामाजिक न्याय आणि विषेश सहाय्य या खात्याचे ते मंत्री झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या विस्तारात त्यांना अखेर स्थान मिळाले आहे. खरे त्यांना हे स्थान सहज मिळालेले नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित... आणखी वाचा
सरकारनामा ब्युरो
युवराज आदित्य ठाकरे तीस वर्षाचे झाले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेने विधानसभेसाठी शक्तीप्रदर्शन करण्यास सुरवात केली आहे. राज्यातील सर्व आमदारांना मातोश्रीवर येण्याच्या सूचना ठाकरे घराण्याचे निष्ठावंत नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. शिंदे यांच्याप्रमाणे संजय राऊत यांनीही युवराजांवर स्तुतिसुमने उधळताना ते राज्याचे मुख्यमंत्री होतील असे म्हटले आहे.  शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्री पाहणे हे या... आणखी वाचा
सम्राट फडणीस
अलिकडच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील सुजय विखे पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील असे तरूण नेते भाजपमध्ये दाखल झाले. देशातील अग्रगण्य शाहू सहकारी साखर कारखान्याचे समरजित घाटगे अध्यक्ष आहेत. विक्रमसिंह यांच्या काळात या कारखान्याचा देशभरात लौकिक झाला. सहकार हे काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीचे क्षेत्र. या क्षेत्रातल्या सर्वोत्तम कारखान्याचा तरूण अध्यक्ष भाजपच्या सोबत असणं, हे बदललेल्या राजकारणाचे... आणखी वाचा