Black Flags Shown to Vikhe Patil in Aurangabad by Youth NCP | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

राधाकृष्ण विखे पाटलांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दाखवले काळे झेंडे 

प्रकाश बनकर 
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

नाशिक, नगर भागातील धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्याचा प्रश्‍न सध्या चांगला पेटला आहे. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी जायकवाडीत सोडण्याचे न्यायालयाचे आदेश असतांना नगर-नाशिक मध्ये सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे अद्याप जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आलेले नाही. 

औरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काचे पाणी जायकवाडीत सोडले जाऊ नये, यासाठी विरोध आणि न्यायालयात याचिका दाखल करणारे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांना आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसने काळे झेंडे दाखवले. 

जनसंघर्ष यात्रे दरम्यान, सिल्लोड येथे जाहीर सभेला जाण्यासाठी निघालेल्या राधाकृष्ण पाटील यांना औरंगाबादच्या केंम्ब्रीज चौकात काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या घरी भोजन करून निघताच, बाहेर उभ्या असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विखेंना घेराव घालत पाणी प्रश्‍नावर जाब विचारत धारेवर धरले. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकी देखील झाली. नाशिक, नगर भागातील धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्याचा प्रश्‍न सध्या चांगला पेटला आहे. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी जायकवाडीत सोडण्याचे न्यायालयाचे आदेश असतांना नगर-नाशिक मध्ये सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे अद्याप जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आलेले नाही. 

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांनी देखील साखर कारखान्याच्या माध्यमातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेसोबत विखे औरंगाबादेत दाखल होता जालना रोडवरील कॅम्ब्रीज चौकात राष्ट्रवादी युवक काँसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. 

जनसंघर्ष यात्रेतील गाड्यांचा ताफा माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या निवासस्थानी गेला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज पवार आदी नेते यांच्यासाठी काळे यांच्या घरी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच त्यांनी कल्याण काळे यांच्या निवासस्थानी धाव घेतली. जेवण करून काँग्रेसचे नेते बाहेर येताच युवक कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना घेराव घालत जायकवाडीच्या प्रश्‍नावर तुमची भूमिका काय? असा जाब विचारला. त्यामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. 

दरम्यान, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार विखे पाटलांच्या मदतीला धावून आले. आधी त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण संतप्त कार्यकर्ते ऐकण्याचा मनस्थितीत नव्हते. तेव्हा सत्तार यांनी कार्यकर्त्यांना बाजुला लोटत विखे पाटलांना मार्ग करून दिला. यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. 

#सरकारनामा होऊ दे चर्चा!

वाचकांनी आवर्जून वाचावा अन् राजकीय टीकाकारांनी जवळचा कीबोर्ड शोधावा .. आम्ही घेऊन आलोय #सरकारनामा..!

राजकारणाची आजची दशा सांगणारा आणि उद्याची दिशा ठरवणारा #सरकारनामा.. प्रत्येकाच्या संग्रही असावा असा राजकीय दस्तावेज!

आजच जवळच्या विक्रेत्याकडं संपर्क साधा.. अंक Amazon.in वरही उपलब्ध आहे #नातंशब्दांशी

संबंधित लेख