BJP"s success in Sangli & Jalgaon unprecedented : Devendra fadnvis | Sarkarnama

सांगली आणि जळगावात भाजपला अभूतपूर्व यश :  देवेंद्र फडणवीस

मृणालिनी नानिवडेकर.
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

आज राज्यात अनेक आंदोलने सुरू आहेत. मोर्चे सुरू आहेत. मागण्या मांडल्या जात आहेत. त्या मागण्या महत्त्वपूर्ण आणि न्यायपूर्ण आहेत.

मुंबई :  जळगाव आणि सांगलीच्या नागरिकांनी भाजपला अभूतपूर्व यश दिले आहे. जनतेचा कौल आम्ही नम्रतेने स्वीकारतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आज राज्यात अनेक आंदोलने सुरू आहेत. मोर्चे सुरू आहेत. मागण्या मांडल्या जात आहेत. त्या मागण्या महत्त्वपूर्ण आणि न्यायपूर्ण आहेत. मात्र महाराष्ट्रातील जनतेला हे माहिती आहे की हे प्रश्‍न आता नाही तर गेल्या 40-50 वर्षात निर्माण होत गेले आहेत. राज्य सरकार हे प्रश्‍न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे, याची जाणीव जनतेला आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला विजयी केले आहे. या विजयाने वेगवेगळ्या समाजाचे प्रश्‍न, आरक्षण, रोजगार, बेरोजगारी, विकास असे प्रश्‍न सोडवायला नवीन पाठबळ मिळेल.''

श्री. फडणवीस पुढे म्हणाले, "जळगावात गिरीश महाजन यांनी यशस्वी नेतृत्व केले. राजूमामा भोये आणि नाथाभाऊ खडसे यांनी देखील खूप परिश्रम घेतले. सांगलीमध्ये पालकमंत्री सुभाष देशमुख, चंद्रकांतदादा पाटील, सांगलीचे आमदार, खासदार यांनीही परिश्रम घेतले. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख