BJP's Rajendra Gavit Wins Palghar Loksabha Seat | Sarkarnama

भाजपचे राजेंद्र गावित पालघरमध्ये विजयी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 31 मे 2018

भाजपचे खासदार चिंतामणी वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे राजेंद्र गावित 44589 मतांनी विजयी झाले.

पालघर : भाजपचे खासदार चिंतामणी वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे राजेंद्र गावित 44589 मतांनी विजयी झाले. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार होते.

शिवसेनेने दिवंगत वनगा यांचे पूत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये अस्वस्थता होती. भाजपाने काँग्रेसमधून राजेंद्र गावित यांना आयात करत त्यांना उमेदवारी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही प्रचारासाठी भाजपने आणले होते. शिवसेनेनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. 

संबंधित लेख