bjps muslim women candidate won in sangli | Sarkarnama

#SangliResult भाजपकडून 3 मुस्लीम महिला उमेदवार विजयी 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सत्ताकाळापेक्षा भाजपच्या सत्ताकाळात सभागृहातील मुस्लिम धर्मियांचे प्रतिनिधित्व वाढणार आहे. गत सभागृहात आठ मुस्लिम सदस्य होते. आता ते 4 ने वाढले आहे. सभागृहात आठ महिला तर चार पुरुष असे 12 मुस्लिम सदस्य असतील. 

सांगली : कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सत्ताकाळापेक्षा भाजपच्या सत्ताकाळात सभागृहातील मुस्लिम धर्मियांचे प्रतिनिधित्व वाढणार आहे. गत सभागृहात आठ मुस्लिम सदस्य होते. आता ते 4 ने वाढले आहे. सभागृहात आठ महिला तर चार पुरुष असे 12 मुस्लिम सदस्य असतील. 

मुस्लिम तर पूर्णता भाजप विरोधी असल्याचे भासवले जाते पण सांगली महापालिका निवडणुकीत ही समिकरणेही खोटी ठरवत मतदारांनी मुस्लिम नगरसेवकांनाही भाजपच्या चिन्हावर निवडून दिले आहे. भाजपने 9 मुस्लिम नगरसेवकांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी तिघे सभागृहात असतील. त्यापैकी प्रभाग 10 मधून अनारकली कुरणे, प्रभाग 12 मधून नसीम शेख आणि प्रभाग 18 मधून नसीम नाईक या तिघी भाजपचे सभागृहात प्रतिनिधित्व करतील. 

सांगली-मिरजेच्या इतिहासात भाजपकडून प्रथमच तीन मुस्लिम महिला नगरसेवक निवडून आल्या आहेत. त्यामुळे येथील मुस्लिम मतदारांनीही भाजपवर विश्‍वास दाखवला असल्याची चित्र आहे. याशिवाय राष्ट्रवादीकडून रईसा रंगरेज, मैनुद्दीन बागवान, नर्गिस सय्यद, रझिया काझी, अतहर नायकवडी तर कॉंग्रेसकडून वहिदा अय्याज नायकवडी, मदिना बारूदवाले, फिरोज पठाण, हारूण शिकलगार सभागृहात प्रतिनिधित्व करतील. 

संबंधित लेख