bjp`s mp number will go down to 100 | Sarkarnama

शंभरी गाठलेले पेट्रोल भाजप खासदारांची संख्या १०० वर आणणार : जयंत पाटील

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातून भाजपचे अधिक खासदार निवडून गेले अाहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात पेट्रोल सर्वाधिक महाग झाले आहे. याचा फटका आगामी लोकसभा निवडणुकीत बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

ते म्हणाले,``मुंबईत पेट्रोलच्या दराने नव्वदी गाठली आहे. परभणीत हे दर ९२ च्या वर गेले आहेत. मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाला महागाईची झळ बसू लागली आहे. मोदी सरकारने जनाची नाही मनाची तरी लाज बाळगली पाहिजे.

वाढलेले दर कमी करणे हे सरकारच्या हातात आहे. सेंट्रल एक्साईस कर कमी केले, महाराष्ट्र सरकारने व्हॅल्यू ऍडेड टॅक्स कमी केले आणि मुख्यमंत्र्यांनी मनात आणले तर १५ रु व्हॅल्यू ऍडेड टॅक्स कमी करून जनतेला दिलासा देऊ शकतात. पण सरकारची तिजोरी रिकामी आहे म्हणून सामान्य माणसाच्या खिशात हात घातला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

मला वाटतं की पेट्रोल शंभरी गाठेल, रुपयाही शंभरी गाठेल आणि जनता भाजपला शंभर खासदारांवर आणून ठेवेल, असा टोला त्यांनी हाणला. जगात सर्वांत जास्त पेट्रोल महाराष्ट्रात महाग आहे. लोक भाजपवर प्रचंड नाराज आहेत. जनतेला आता कोणी वाली उरला नाही, अशी भावना लोकांच्या मनात असल्याचेही ते म्हणाले. 

भाजपचे नेते विरोधात असताना या दरवाढीबद्दल कशी टीका करत होते, हे जनतेला माहिती आहे. या नेत्यांच्या तेव्हाच्या बोलण्याच्या व्हिडीओ क्लिप सोशल मिडियातून फिरत आहेत. त्यातून तर या नेत्यांनी बोध घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला. 

संबंधित लेख