BJP's Money Management in Hands of Girish Mahajan alleges Ashok Chavan | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

भाजपच्या पैशांची 'मॅनेजमेंट' गिरीश महाजनांकडे : अशोक चव्हाणांचा आरोप 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

भाजप निवडणुकांत प्रचंड पैसा ओततो आहे. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे एव्हढे एकच काम दिलेले आहे. गिरीश महाजन आणि गिरीश बापट यांच्याकडे इलेक्शन मॅनेजमेंट एव्हढेच काम आहे. त्यात अनेक मुद्दे आहेत. पैशांचा एवढा बेसुमार वापर होतो आहे की, लहान लहान निवडणुकांत खुप पैसा ओतला जातो आहे - अशोक चव्हाण

नाशिक : "भाजपवाले निवडणुकीत सांगतात आमच्याकडे या. पैसे घ्या. उमेदवारी घ्या. अन्यथा तुमची फाईल तयार आहे. त्याला बळी न पडणारे फार थोडे आहेत. नगरला केडगावमध्ये आमदार कर्डिलेंमार्फत तोच प्रयोग करण्यात आला. प्रचंड पैशाचा वापर भाजप करते आणि मंत्री गिरीश महाजन त्याचे मॅनेजमेंट करतात. त्यांच्याकडे तेव्हढेच काम आहे," असा आरोप माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. 

'कृषीथॉन' प्रदर्शनाच्या निमित्ताने झालेल्या वार्तालापात ते बोलत होते. ते म्हणाले, ''भाजप निवडणुकांत प्रचंड पैसा ओततो आहे. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे एव्हढे एकच काम दिलेले आहे. गिरीश महाजन आणि गिरीश बापट यांच्याकडे इलेक्शन मॅनेजमेंट एव्हढेच काम आहे. त्यात अनेक मुद्दे आहेत. पैशांचा एवढा बेसुमार वापर होतो आहे की, लहान लहान निवडणुकांत खुप पैसा ओतला जातो आहे. नगर महापालिका निवडणुकीत केडगावला पहाटे चारला आमदार कर्डिले यांनी काँग्रेसच्या पाच जणांना फोन केला. तुमच्या विरोधात असे गुन्हे आहेत. त्याची फाईल तयार आहे. त्यामुळे पैसे घ्या, भाजपची उमेदवारी घ्या अन्‌ निवडणुक लढा. अन्यथा कारवाई होईल असे धमकावले. ते उमेदवार भाजपमध्ये गेले." 

ते पुढे म्हणाले, ''स्वतः नितीन गडकरी बोलले की, आमच्याकडे आला की माणुस पावन होतो. माझ्या कानावर आले आहे की, येत्या देशातील लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पस्तीस हजार कोटींचे बजेट ठेवले आहे. प्रत्येक उमेदवाराला किमान दहा कोटी जरी दिले तरी काय होईल? हे मोठे दुर्देव आहे की सरकारच्या सर्व यंत्रणांचा गैरवापर केला जातो आहे. दबावतंत्राचा वापर होतो. आमच्याकडे ये, पैसे घे. तिकीट घे. अन्यथा फाईल तयार आहे. असे सांगितले जाते. त्याला बळी न पडणारे थोडे आहेत." 

संबंधित लेख