bjp`s end game starts yesterday : Bhujabal | Sarkarnama

भाजपच्या शेवटाची कालपासून सुरवात : छगन भुजबळ

अश्विनी जाधव-केदारी
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पुणे : भाजपने २०१४ च्या निवडणुका विकास या शब्दाला घेऊन लढवल्या. तो विकास कुठे गायब झाला, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज विचारला. हनुमनाची जात कुठली हे सुद्धा ते सांगायला लागले. बाकी प्रश्न राहिले बाजूला. जातीजातींत भांडणे लावण्याचा उद्योग सुरू आहे. त्यामुळे भाजपची आगामी काळात होणाऱ्या शेवटाची कालपासून सुरवात झाली आहे, असा दावाही त्यांनी केला.

माजी केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह आणि भुजबळ यांनी आज एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेतली. कुशवाह यांनी एनडीए सोडून मोदींवर टीका केली. चार राज्यांत झालेल्या निवडणूक निकालाचे परिणाम आगामी काळात दिसतील आणि भाजपची सत्ता जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. काँग्रेस- राष्ट्रवादीतून अनेकजण भाजप मध्ये गेले आता पुन्हा ते घरवापसी करतील. त्यांचा भ्रमनिरास झाला असेल तर त्यांनी परत यायला हरकत नाही, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली. हमें अच्छे दिन नही, हमारे दिन चाहिये, असाही दावा त्यांनी केला.

कुशवाह यांनीही भाजपची उलटी गणती सुरू झाल्याचे कुशवाह यांनी सांगितले. आता आमच्याजवळ तीन पर्याय आहेत. एक स्वतंत्र लढणे, दुसरा महाआघाडीत जाऊ किंवा तिसऱ्या आघाडी जाऊ, अशी रणनीती त्यांनी या वेळी स्पष्ट केली.
 
संबंधित लेख