bjp`s celebration in Pune | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

भाजपने पुण्यात जागरण- गोंधळ घालून केला जल्लोष!

उमेश घोंगडे
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पुणे : विधानसभा व विधानपरिषदेत मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्याचा आनंद शहर भारतीय जनता पक्षाने टिळक चौकात जागरण गोंधळ घालून व्यक्त केला. शहरात विविध ठिकाणी फटाके वाजविण्यात आले. 

पुणे : विधानसभा व विधानपरिषदेत मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्याचा आनंद शहर भारतीय जनता पक्षाने टिळक चौकात जागरण गोंधळ घालून व्यक्त केला. शहरात विविध ठिकाणी फटाके वाजविण्यात आले. 

आता आंदोलन नको; एक डिसेंबरला जल्लोष करा, असे मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी दहा दिवसांपूर्वी जाहीर केले होते. मात्र त्याआधी आजच विधानसभा व विधानपरिषदेत आरक्षण मंजूर झाल्याने राज्यभर आजच जल्लोष करण्यात आला. मराठा आरक्षण मंजूर झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी साखर, पेढे वाटून तसेच फटाके वाजवून स्वागत करावे, असे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे पुण्यात आज अनेक ठिकाणी दुपारपासूनच जल्लोष करण्यात आला.

शहर भाजपाच्यावतीने टिळक चौकात मोठा जल्लोष करण्यात आला. आनंद व्यक्त करण्यासाठी यावेळी जागरण गोंधळ घालण्यात आले. पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ऐतिहासिक कामगिरी केले आहे, असे यावेळी गोगावले यांनी सांगितले. 

भाजपाचा ध्वज व भगवे फेटे बांधलेल्या कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून गटागटाने शहरातून रॅली काढली. शहराच्या काही भागात चौका-चौकात ध्वनिवर्धक लावून आनंद व्यक्त करण्यात आला. दिलेल्या शब्दाप्रमाणे आरक्षण वेळेत दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करणाऱ्या घोषणा देण्यात येत होत्या. दिलेल्या आरक्षणाला न्यायालयात कुणी आव्हान दिले तर आरक्षण टिकावे यासाठी राज्य सरकारने जय्यत तयारी केली पाहिजे, अशी भूमिका अनेकांनी मांडली. 

संबंधित लेख