Bjp workers unhappy as outsiders get cream positions | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

बाहेरच्यांना महामंडळे,घरच्यांना काय ?  भाजप कार्यकर्त्यांची नाराजी

मृणालिनी नानिवडेकर : सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 4 जुलै 2017

मुंबई:  भारतीय जनता पक्षात बाहेरुन आलेल्या नेत्यांवर महामंडळांची खैरात सुरू असताना घरच्या कार्यकर्त्यांनी नेमणुकीसाठी किती प्रतीक्षा करायची असा प्रश्‍न निष्ठावंत करीत आहेत.

मुंबई:  भारतीय जनता पक्षात बाहेरुन आलेल्या नेत्यांवर महामंडळांची खैरात सुरू असताना घरच्या कार्यकर्त्यांनी नेमणुकीसाठी किती प्रतीक्षा करायची असा प्रश्‍न निष्ठावंत करीत आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्ष आपल्याला काय देतो याचा विचार न करता आपण पक्षाला काय देवू शकतो याचाच विचार करा असे निक्षून सांगितले असतानाच बाहेरून आलेल्यांना मात्र पदे दिली जात असल्याचे मानले जाते. स्व.विलासराव देशमख यांच्या घराण्यातील काहींना पक्षाने निवडणुकीवर डोळा ठेवून उमेदवारी दिली होती मात्र घरच्यांना डावलून या उपऱ्यांना मंदिर समितीची अध्यक्षपदे दिली जात असल्याचा आरोप करण्यात येतो आहे.

मुंबईत पक्षात आलेल्या बाहेरच्या मंडळींना महापालिका निवडणुकीत स्वत:चेच नातेवाईक जिंकवून आणता आले नाहीत ,संघटनात्मक कामातून पक्षाला मोठे करण्याऐवजी उपऱ्यांना मोठे करण्याच्या प्रकाराची तक्रार करायची तरी कुणाकडे असा प्रश्‍न कार्यकर्ते विचारित आहेत.

संबंधित लेख