कार्यकर्ते भाजपचे अन प्रचार करतात राष्ट्रवादीचा 

आमदार कर्डिले सध्या भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. त्यांनीही जावयासाठी पक्षीय राजकारण थोडे बाजूला ठेवावे, असा आग्रह त्यांना कार्यकर्ते करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
 कार्यकर्ते भाजपचे अन प्रचार करतात राष्ट्रवादीचा 

नगर  :"  कॉंग्रेसचे 'ते' स्टार प्रचारक व विधानसभेतील विरोधी पक्षनेते असूनही मुलगा भाजपमध्ये आल्याने त्याच्यासाठी उघडपणे कमळाचा प्रचार करतात. मग आम्ही आमच्या जावयासाठी प्रचार केल्यास बिघडले कुठे?," असा सवाल उपस्थित करत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांनी आज उघडपणे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारात सक्रिय होण्याचा पवित्रा घेतला. 

आमदार कर्डिले सध्या भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. त्यांनीही जावयासाठी पक्षीय राजकारण थोडे बाजूला ठेवावे, असा आग्रह त्यांना कार्यकर्ते करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

पिंपळगाव लांडगा (ता. नगर) येथे आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्यासाठी कार्यकर्ता मेळावा झाला. त्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह भाजप व शिवसेनेचे काही पदाधिकारी व कार्यकर्तेही उघडपणे सहभागी झाले.

त्यात खास करून आमदार कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब दरेकर होते. आमदार राहुल जगताप, प्रताप शेळके, रोहिदास कर्डिले, केशव बेरड, किसन लोटके, संपतराव म्हस्के यांच्या पुढाकाराने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. 

या मेळाव्यात आमदार जगताप म्हणाले, "देशात शेतकरीहिताचे धोरण राबविण्याची गरज असताना मोदी सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांच्या समस्या न सोडविल्यानेच आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या. मात्र, त्याविषयीच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्याऐवजी हे शहीद जवानांच्या नावावर मते मागून मूळ प्रश्‍नांना बगल देत आहेत.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com