BJP will lose power in Rajasthan & Madhya Pradesh : Jayant Patil | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

राजस्थान -मध्यप्रदेश भाजपाच्या हातातून जाणार : जयंत पाटील

धर्मवीर पाटील
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

सध्या सुरू असलेल्या चार राज्यांच्या निवडणूकात राजस्थान भाजपाच्या हातातून जाणार आहे.

-जयंत पाटील

इस्लामपूर  : "  कर्नाटक राज्यातील लोकसभा व विधानसभेच्या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार लाखाच्या फरकाने पराभूत झाले असून सध्या सुरू असलेल्या चार राज्यांच्या निवडणूकात राजस्थान भाजपाच्या हातातून जाणार आहे. तर मध्यप्रदेशमध्येही तीच परिस्थिती आहे.," असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला . 

जयंत पाटील यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील बुथ समितींच्या अध्यक्ष व सचिवांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.  राज्यात काँग्रेस पक्षासह मित्रपक्षांशी आघाडीची समाधानकारक चर्चा सुरू असून राज्यात आघाडीचे सरकार येवू शकते असे सांगून कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षांच्या खोटया व अपप्रचारापासून सावध रहावे, असे आवाहन जयंत पाटील यांनी  केले.

श्री पाटील पुढे म्हणाले,'' इस्लामपूर मतदारसंघात विविध घटकांना सामावून घेवून समित्या करा. तसेच मोबाईल अपच्या माध्यमातून पक्षाच्या वतीने सूचना, विविध घटना प्रचार- अपप्रचाराबददल आपणास माहिती दिली देवू. आपणही आपल्या भागातील अडचणी, सूचना करू शकता. आपण नव्या मतदारांच्यापर्यंत पोहचून आपल्या भागातील मतदारांचा कल जाणून घ्या. मला राज्यात फिरावे लागणार असल्याने आपणास जबाबदारी घेवून काम करावे लागेल. येत्या ९ डिसेंबरला बोरगाव येथे  जाहीर सभा होणार आहे."

संबंधित लेख