लोकसभा : शिवसेनेच्या मावळ आणि शिरूरवर भाजपचा दावा !

पिंपरी : युती झाली,तरी पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या मावळ आणि शिरूर या पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजप दावा करणार असल्याचे भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी आज येथे सांगितले.
barne-adhalrao-jagtap-landg
barne-adhalrao-jagtap-landg

पिंपरी  :  युती झाली,तरी पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या मावळ आणि शिरूर या पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजप दावा करणार असल्याचे भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी आज येथे सांगितले.

एकीकडे भाजपकडून शिवसेनेशी जुळवून घेण्याचे वरिष्ठ पातळीवर चालले असताना शिवसेनेच्या या दोन्ही जागांवर भाजपने दावा केल्याने तेथे जागावाटपाचा तिढा आताच निर्माण झाला आहे.

शिरूर आणि मावळमध्ये शिवाजीराव आढळरावदादा-पाटील आणि श्रीरंगअप्पा बारणे हे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत.मागील वेळी जागावाटपात या दोन्ही जागा शिवसेनेकडे होत्या.एवढेच नाही,तर शिरूरमधून त्यांचे  उमेदवार (आढळराव) सलग तीनवेळा निवडून आलेले  आहेत .त्यामुळे तो मतदारसंघ आढळरावांचा बालेकिल्लाच झाला आहे. असे असताना त्या जागेवर भाजपने आज दावा केला. 

एवढेच नाही,तर मावळमधूनही आम्हीच लढणार असल्याची घोषणा तेथून भाजपच्या उमेदवारीचे मोठे दावेदार असलेल्या जगताप यांनीच केल्याने तिला वजन प्राप्त झालेले आहे. बारणे हे जगताप यांचे एक नंबरचे राजकीय शत्रू आहेत.त्यांनीच त्यांनीच गतवेळी २०१४ मध्ये  भाऊंचा  पराभव केला होता. मावळ आणि शिरूरवर दावाच करून भाऊ थांबले नाहीत.तर तेथून त्यांनी लढण्याचीही तयारी दाखविली. बारामतीतून मी लढणार असल्याची आवई काल हल्लाबोलमध्ये उठल्याच्या पार्श्वभूमीवर गुगली टाकत ते म्हणाले,शिरूरमधून मी आणि मावळ येथून महेशही उमेदवार असेल.

गेल्यावेळी लोकसभेला शिवसेना,भाजपमध्ये युती होती. त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभेला ती तुटली होती. यावेळी, त्याच्या उलट घडेल, असे भाऊंचे वक्तव्य सांगत आहे. एकमात्र, नक्की की,जर भाऊ आणि दादा हे लोकसभेला उमेदवार असतील,तर मावळ आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघातील लढत राज्यात लक्षवेधी आणि अटीतटीची होईल, यात शंका नाही. 

त्यामुळे या स्थितीत दोघांच्या भांडणात तेथे राष्ट्रवादीची लॉटरी लागू शकते,असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.मात्र, त्यासाठी त्यांना दादा,भाऊंच्या तोडीचे तालेवार सक्षम उमेदवार द्यावे लागतील. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com