bjp vadgaon sheri news | Sarkarnama

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ कायम ठेवण्यासाठी भाजपची चाल ? 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 मार्च 2018

येरवडा : जुना बोपोडी तर नवीन वडगावशेरी मतदार संघात चौथ्यांदा स्थायी समितीचे अध्यक्ष पद मिळाले आहे. सुरवातीला ऍड संगीता देवकर, बापू पठारे,बापूराव कर्णे गुरुजी तर आता योगेश मुळीक हे स्थायी समितीचे अध्यक्ष होत आहेत. त्यामुळे येरवड्यातील विशेषत: गांधीनगर आणि जयप्रकाशनगरचा कर्णे गुरुजींनी तर खराडीत पठारे यांनी कायापालट केला. त्यामुळे वडगावशेरीकरांना मुळीक यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. तर वडगावशेरी मतदार संघाची जागा पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कायम ठेवण्यासाठी भाजपची चाल असल्याची चर्चा आहे. 

जुना बोपोडी मतदार संघ असताना ऍड देवकर स्थायी समिती अध्यक्षा झाल्या होत्या. त्यांनी त्यांच्या कार्यकालात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू, बंडगार्डन बंधारा हे महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची पायाभरणी केली . तर पठारे यांनी खराडी आयटी पार्कमध्ये भौतिक सोईसुविधा आणल्या. भामा आसखेड पाणी प्रकल्पाचेही त्यांच्या काळात मुहूर्तमेढ झाली. तर कर्णेगुरूजींनी गांधीनगर,जयप्रकाशनगर सारख्या वस्त्यांमध्ये घरकुल प्रकल्प आणून तेथील कायापालट केला. 

मात्र येरवड्यातील गोल्फ क्‍लब, गुंजन चौक व शास्त्रीनगर चौकात ग्रेडसेपरेटर किंवा उड्डाणपूल करण्याचे स्वप्न त्यांनी केवळ अर्थसंकल्पात दाखविले. त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर तांत्रिकबाब पुढे करू तेथे ग्रेड सेपरेटर किंवा उड्डाणपूल होणार नसल्याची भूमिका घेतली. 

स्थायी समिती अध्यक्षांकडे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असल्यामुळे शहरातील विकासकामासह स्वत:च्या प्रभागात अधिक लक्ष देणे हे स्वाभाविकच आले.त्यामुळे वडगावशेरीकरांना मुळीक यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत योगेश मुळीक यांचे बंधू जगदीश मुळीक यांना निसटता विजय मिळाला आहे. 

शिवसेनेकडून उमेदवार असलेले व सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक सुनील टिंगरे यांना 63 हजारापेक्षा अधिक मते होती. तर तिसऱ्या क्रमांकाची अर्थात तीस हजारापेक्षा अधिक मते माजी आमदार बापू पठारे यांना होती. ही मते एकत्र झाल्यास जगदीश मुळीक यांना निवडणून आणणे भाजपची डोकीदुखी होऊ शकते. त्यामुळे भाजपने आतापासूनच मोर्चे बांधणी करायला सुरवात केली आहे. त्यामुळे भाजपला सुरक्षित असलेल्या मतदार संघात अर्थात पर्वती आणि हडपसर येथील अनुक्रमे सुनील कांबळे व योगेश टिळेकर स्थायीच्या अध्यक्ष पदाच्या शर्यतीतून मागे पडल्याचे बोलले जाते. 

संबंधित लेख