भाजपने शिवसेनेला ईडीची भीती घालून युतीस भाग पाडले : विखे पाटील 

.
Radhakrishna-Vikhe-Patil
Radhakrishna-Vikhe-Patil

पुणे : " भाजपने शिवसेनेला ईडीची भीती घालून युती करण्यास  भाग पाडले असल्याची माझी माहिती आहे ," असा आरोप काँग्रेसचे नेते राधाकृष्ण  विखे पाटील पाटील यांनी केला आहे . 

श्री. विखे पाटील म्हणाले, " अजून राम मंदिर झाले नाही . शेतकरी वाऱ्यावर सोडले . मग शिवसेना युतीस  तयार का झाली ?  भाजपने शिवसेनेला ईडीची भीती घालून युती करण्यास  भाग पाडले असल्याची माझी माहिती आहे . पार्टी विथ डिफरन्स अशी ख्याती असलेल्या भाजपचे खरे रूप असे आहे . "

" भाजपचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरुद्ध शिवसेनेने पातळी सोडून टीका केलेली आहे . भाजप नेत्यांचा वारंवार जाहीर अपमान केलेला आहे . हा सर्व अपमान गिळून शिवसेनेच्या दारात भाजप आज उभी आहे. यावरूनच दोन्ही पक्ष किती घाबरलेले आहेत याचा अंदाज येतो  ," असा टोलाही श्री. विखे पाटील यांनी लगावला आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com