पंचम कलानींच्या महापौरपदासाठी भाजपने शिवसेनेचा असा केला गेम !

उल्हासनगर महापालिकेचे महापौरपद मिळविताना भाजपच्या पंचम कलानी यांच्यासाठी महारथींनी लावलेली फिल्डिंग अखेर कामाला आली .
Pancham-omi-Kalani
Pancham-omi-Kalani

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेचे महापौरपद मिळविताना भाजपच्या पंचम कलानी यांच्यासाठी महारथींनी लावलेली फिल्डिंग अखेर कामाला आली .

भाजपला महापौर पदापासून वंचित ठेवण्याचे शिवसेनेचे डावपेच राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी उधळून लावले . त्यामुळे कागदोपत्री बहुमत शिवसेना पुरस्कृत उमेदवाराकडे दिसत असतानाही प्रत्यक्षात भाजप नेत्यांच्या डावपेचांनी पंचम कलानी यांचे पारडे जड झाले . 

महानगरपालिकेत भाजपा-साई पक्षाची युती.भाजपाच्या 32 पैकी सर्वाधिक नगरसेवक हे टीम ओमी कलानी समर्थक.करारानुसार पहिल्या सव्वा वर्षासाठी मीना आयलानी यांना महापौर पद  देण्याचे ठरले  होते तर तर दुसरी सव्वा वर्षाची टर्म  पंचम कलानी यांची राहील असेही ठरले होते . 

.आयलानी यांचा कालावधी 4 जुलै मध्ये संपला.पण त्या राजीनामा देत नसल्याने बेबनावाची परिस्थितीनिर्माण झाली होती .ओमी कलानी यांना साईपक्षातील 12 पैकी 7 नगरसेवकांचा विरोध होता .या ७ नगरसेवकांनी  शिवसेनेशी हातमिळवणी केली.आणि साईच्या  बंडखोर गटातील ज्योती बठीजा यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला

.शिवसेना-साई-राष्ट्रवादी-रिपाइं आठवले - कॉंग्रेस - भारिप -पीआरपी मिळून 41 हे होणारे विजयी संख्याबळ ठरले असते .पंचम कलानी यांना आव्हान देण्यात आले.अशात कमांडरची भूमिका निभावणारे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामुळे उल्हासनगरातील मास्टरमाईंडांची टीम एकवटवली.

धक्कातंत्र सुरू झाले आणि पप्पू कलानी-ज्योती कलानी यांची सून व ओमी कलानी यांची पत्नी पंचम कलानी यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शब्द पाळल्याने अशक्‍याचे शक्‍यात रूपांतर झाले.

 इंदर भटीजा हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाल्याने  पप्पू कलानी जेल मध्ये आहेत.त्यांच्या जागी त्यांचे पुत्र ओमी कलानी यांनी राजकारणाची सूत्रे हाती घेतल्यावर त्यांनी त्यांची आई ज्योती कलानी यांना त्यांच्या टीमच्या मदतीने आमदार म्हणून निवडून आणले.

पोटनिवडणुकीतही बाजी मारली. आणि 2017 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत टीम ओमी कलानीचे नगरसेवक भाजपाच्या तिकिटावर निवडून आणले.भाजपाच्या 32 नगरसेवकांपैकी अधिकांश नगरसेवक ओमी कलानी टीमचे आहेत.

ज्योती कलानी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आहेत . राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिकेतील गटनेत्याने  शिवसेना पुरस्कृत उमेदवार ज्योती बठीजा यांना मतदान करण्याचा व्हीप आपल्या चार नगरसेवकांना जारी केला होता .

पण आमदार ज्योती कलानी यांनी पक्षातील आपला प्रभाव वापरून हा व्हीप  रद्द करायला लावला आणि नगरसेवकांना तटस्थ राहण्याचा नवा व्हीप  जारी करायला लावला . त्यामुळे ज्योती कलानी यांच्या  सुनबाई पंचम कलानी यांचा मार्ग मोकळा झाला . 

वरिष्ठ पातळीवर पहिले सव्वा वर्ष मीना आयलानी व दुसरी खेप पंचम कलानी यांचा असा करार झाला.मात्र 4 जुलै ला आयलानी यांचा कालावधी संपल्यावरही त्या राजीनामा देत नसल्याने ओमी कलानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे साकडे घातले.शेवटी आयलानी यांनी राजीनामा दिला . 

 कलानी यांना  विरोध असलेल्या साई पक्षातील 12 पैकी 7 नगरसेवकांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली.याखेळी मागे साईपक्ष अध्यक्ष गटनेते तथा उपमहापौर जीवन इदनानी यांचे डोके असण्याची शक्‍यता दब्या स्वरात वर्तवली जाऊ लागली .भाजपातील बोटावर मोजण्या इतपत असलेले नगरसेवक देखील कलानी यांच्या विरोधात असल्याची वातावरण निर्मिती तयार झाली.अशात रवींद्र चव्हाण यांनी कमांडरची सूत्रे हाती घेतली.

पंचम कलानी यांचा महापौर पदाचा अर्ज सादर करताना उपमहापौर जीवन इदनानी,भाजपा जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी,माजी महापौर मीना आयलानी,सभागृह नेते जमनादास पुरस्वानी,अभ्यासू नगरसेवक राजेश वधारिया सोबत असल्याने रवींद्र चव्हाण यांनी खेळ जमवून आणला   ,असे वातावरण तयार झाले.

शिवसेना-साईपक्षाच्या बंडखोर  गटाचे नगरसेवक पालघर मध्ये राहिले . पण भाजपा-साईपक्षाच्या पहिल्या गटातील नगरसेवक गोव्यामध्ये गेले.जीवन इदनानी हे शहरातच राहिल्याने दाल मे कुछ तो काला है,जीवन यांनीच दुसऱ्या गटाला शिवसेनेत जाण्यासाठी उकसवले अशी चर्चा होऊ लागली.

मात्र जीवन इदनानी यांची पत्नी माजी महापौर आशा इदनानी,माजी महापौर मीना आयलानी यांच्यासह   पंचम कलानी असे  तिघींचे प्रसन्न मुद्रेतील फोटो गोव्या मधून मासमीडियावर व्हायरल झाले.

जे साई पक्षातील 7 नगरसेवक शिवसेने सोबत पालघर मध्ये होते त्यापैकी शेरी लुंड,नगरसेविका कंचन लुंडचे पती अमर लुंड यांचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण,ओमी कलानी,कुमार आयलानी,प्रकाश माखिजा,जमनादास पुरस्वानी यांच्या सोबतचे गोव्यातील फोटो ही व्हायरल झाल्याने कलाटणी मिळत गेली.

जीवन इदनानी,ओमी कलानी,प्रकाश माखिजा,उद्योगपती सुमित चक्रवर्ती कोणत्याही परिस्थितीत पंचम कलानी ह्याच महापौर होणार असा दावा करणारे करणारे अभ्यासू नगरसेवक राजेश वधारिया आदी सर्व मास्टरमाईंड एकवटल्याचा संदेश उल्हासनगरात पसरला.

तर दुसरीकडे शिवसेने सोबत असलेले राष्ट्रवादीला तटस्थ राहण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून मिळाले.विजयाची आकडेवारी घसरू लागल्याने साईपक्षाच्या ज्योती बठीजा यांनी माघार घेतल्याने पंचम कलानी यांच्या गळ्यात महापौर पदाची बिनविरोध माळ पडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com