bjp tiranga yatra | Sarkarnama

औरंगाबादेत भाजपची 14 ऑगस्टला तिरंगा यात्रा 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

औरंगाबाद ः दरवर्षी प्रमाणे यंदाही 15 ऑगस्ट स्वांतत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला म्हणजेच उद्या 14 रोजी भाजपच्या वतीने शहरातून तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. क्रांतीचौक ते संस्थान गणपती पर्यंत निघणाऱ्या यात्रेचा समारोप रात्री भारतमातेचे पूजन करून होईल. 

माजी आमदार व भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या पुढाकारातून शहरात गेल्या तीन वर्षांपासून तिरंगा यात्रा काढली जाते. भारतमातेची भव्य प्रतिमा एका सजवलेल्या रथातून क्रांतीचौक ते संस्थान गणपती पर्यंत वाजत गाजत नेली जाते. 

तिरंगा यात्रेत भाजप कार्यकर्त्यांसोबतच शहरातील तरुण मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेता यंदा तिरंगा यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मध्य विधानसभा मतदारसंघातून तनवाणी यांनी शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवली होती. 

2019 मध्ये पुन्हा तनवाणी याच मतदारसंघातून मैदानात उतरणार आहेत. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून त्यांनी मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू केली आहे. तिरंगा यात्रेच्या निमित्ताने पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी त्यांच्या समर्थकांनी चालवली आहे. 

ेएकीकडे तिरंगा यात्रेसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह ओसंडून वाहत असतांना भारताच्या स्वातंत्रदिना निमित्त काढण्यात येणारी ही यात्रा 14 ऑगस्टला म्हणजेच पाकिस्तानच्या स्वांतत्र्यदिनी का ? असा प्रश्‍न देखील विचारला जात आहे. 

यावर खुलासा करतांना तिरंगा यात्रेचे संयोजक किशनचंद तनवाणी म्हणाले, तीन वर्षांपासून आम्ही तिरंगा यात्रा 14 ऑगस्ट रोजी म्हणजे स्वांतत्रदिनाच्या पुर्वसंध्येला काढतो. सांयकाळी सुरू झालेल्या यात्रेचा समारोप रात्री ठीक 12 वाजता भारतमातेचे पूजन करून केला जातो. 

रात्री बारानंतर स्वांतत्रदिनाच्या उत्सवला सुरूवात होते म्हणून पुर्वसंध्येला तिरंगा यात्रा काढली जाते. दुसऱ्या दिवशी महाविद्यालयीन तरूण, सर्वसामान्य नागरिकांना स्वांतत्रदिनाच्या झेंडावदनासह इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होता यावे हाच तिरंगा यात्रा 14 ऑगस्ट रोजी काढण्या मागचा हेतू आहे. 

संबंधित लेख