भाजप-ताराराणी आघाडीचे सूर लागले पुन्हा जुळू 

त्यामुळे हा दुरावा निर्माण झाला होता.
भाजप-ताराराणी आघाडीचे सूर लागले पुन्हा जुळू 

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत एकमेकांपासून दुरावलेल्या भाजप-ताराराणी आघाडीचे आता पुन्हा जमू लागले आहे. उद्या (ता. 19) होणाऱ्या सर्वसाधारण सभेपूर्वी दोन्ही पक्षांची एकत्रीत बैठक होणार आहे.

मध्यंतरी पक्षाच्या बैठकाही वेगवेगळ्या झाल्या होत्या. ताराराणी आघाडीचे नगरसेवक राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा प्रचार करत होते, तर भाजपचे नगरसेवक सेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा प्रचार करत होते. त्यामुळे हा दुरावा निर्माण झाला होता.
 
महापालिकेच्या राजकारणात 2015 मध्ये पहिल्यांदाच भाजपने शिवसेनेला डावलून ताराराणी आघाडीसोबत युती केली. तेव्हापासून हे दोघेही एकत्रच होते. महापालिका निवडणुकीत ताराराणीचे 19 तर भाजपचे 13 नगरसेवक निवडून आले आहेत. दोघेही विरोधी पक्षात बसतात. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार महाडिक यांच्या प्रचारात ताराराणीचे सर्व नगरसेवक आघाडीवर होते, तर भाजपचे नगरसेवक शिवसेना उमेदवार प्रा. मंडलिक यांच्या प्रचारात होते. यामुळे दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांत दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी सर्वसाधारणसभेपूर्वी होणारी पक्षाची बैठकही वेगवेगळी घेतली होती. आता महिनाभराचा काळ गेल्यानंतर ते पुन्हा एकत्र आले आहेत. 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com