भाऊसाहेब वाकचौरे यांची भाजपमधून हकालपट्टी
नगर : माजी खासदार व भाजपचे नेते भाऊसाहेब वाकचौरे यांची आज पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या आदेशानुसार पक्षाचे कार्यालय सचिव मुकुल कुलकर्णी यांनी हकालपट्टी केल्याचे पत्र वाकचौरे यांना पाठविले आहे.
जागावाटपात शिर्डी मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. तेथून शिवसेनेतर्फे खासदार सदाशिव लोखंडे निवडणूक लढवीत आहेत. याच मतदारसंघातून माजी खासदार वाकचौरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली. वाकचौरे यांची ही कृती पक्षशिस्तीचा भंग करणारी असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी वाकचौरे यांच्यावर ठेवला आहे. शिस्तभंगामुळे आपली पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे, असे पत्रात म्हटले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.